बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार

  • Written By: Published:
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार

Manoj Jarange Patil On Ajay Maharaj Barskar : मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू सहकारी आणि अत्यंत जवळचे मित्र आणि कीर्तनकाअजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनीही अजय महाराज बारस्कर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजय बारस्कर हा सरकारचे ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे यांनी केली. बारस्कर यांनी तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट घातल्याचा आरोपही जरांगे यांनी केलाा.

World Book Records : आजचा दिवस ठरला ‘नाटकवार’, एकाच वेळी सादर केली 1500 नाटकं 

अजय महाराज बारस्कर यांनी मोठे खुलासे करत जरांगेंरवर टीकास्त्र डागल्यानंतर आता जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, अजय बारस्कर हा सरकारचा ट्रॅप आहे. हा कसला महाराज आहे, हा तर भोंदू महाराज आहे. बारस्कर यांनी तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट घालत आहेत. आता फक्त पहिला समोर आला आहे, अजून पंधरा-वीस बारस्कर बाहेर येतील. मी जे बोललो, ते कुठल्या संताबद्दल बोललो नाही. तर बारस्करांबद्दल बोललो. मी त्याची मागत नाही, मी तर त्याला बोलतही नाही. तो कसला महाराज… मला पाणी पाजून त्याला मोठं व्हायचं होतं, असा टोलाही जरांगेंनी लगावला.

राज्यसभा निवडणुकीत काय होणार? भाजपच्या खेळीने तीन राज्यांमध्ये INDIA आघाडीचा जीव टांगणीला 

 जरांगे पाटील यांनी माफी मागितली

अजय बारस्कर यांनी आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी संतांबद्दल केलेल्या विधानबाबत माफी मागितली. ते म्हणाले, मी संत तुकाराम महाराज यांना मानतो. मी उपोषणाला बसलो असल्यामुळं त्या चिडचिडीतून माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले असण्याची शक्यता आहे. पण मी संतांबद्दल नाही तर बारस्कर यांना उद्देशून बोललो होतो. आता माझ्या शब्दांना चुकीच्या पध्दतीने दाखवले जाते. माझ्यातोंडून काही शब्द गेले असतील त्याबद्दल मी माफी मागतो, संत तुकाराम महाराजांची माफी मागतो. पण, अजय बारस्कर हे मॅनेज झालेले आहेत, असा आरोप जरांगे पाटलांनी केला.

जरांगे म्हणाले, अजय बारस्करांनी मला शिकवू नये. मला बदनाम करण्यासाठी हा सरकाकरडून प्रयत्न सुरू आहे. बारस्करांनी तुकाराम महाराजांच्या आडून मराठ्यांचं वाटोळ करण्याचा नाद करू नये. ट्रॅपच्या रचून सरकारला वाचवू नका. हे त्यांना पाप त्यांना फेडावं लागले. सरकरानेही हे ट्रॅप बंद करावेत, असं जरांगे म्हणाले.

दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत नेत्यांनी आमच्या घरासमोरून जायचं नाही. 1 तारखेला वृध्द नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज