World Book Records : आजचा दिवस ठरला ‘नाटकवार’, एकाच वेळी सादर केली 1500 नाटकं

World Book Records : आजचा दिवस ठरला ‘नाटकवार’, एकाच वेळी सादर केली 1500 नाटकं

World Book Records : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने (National School of Drama) आज देशभरात एकाच वेळी 1500 नाटके (Drama) सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. नवी दिल्ली येथील एनएसडीच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बंगळुरूहून आलेल्या शैलजा यांनी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांना वर्ल्ड बुक रेकॉर्डचे (World Book Records) प्रमाणपत्र प्रदान केले.

केवळ भारतीय रंगभूमीच्याच नव्हे, तर जागतिक रंगभूमीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा देशातील विविध शहरांमध्ये 1500 नाट्य मंडळांनी एकाच वेळी नाटके सादर केली. सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी दुपारी 4 वाजता बटण दाबून या नाटकांच्या थेट सादरीकरणाचे उद्घाटन केले.

यावेळी एनएसडीचे अध्यक्ष परेश रावल, उपाध्यक्ष भरत गुप्ता, सहसचिव उमा नांदुरी, अमिता साराभाई, संचालक चित्तरंजन त्रिपाठी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एनएसडी कर्मचाऱ्यांनी एक लघु नाटकही सादर केले ज्यामध्ये विकसित भारताचा संदेश देण्यात आला. या नाटकाचे दिग्दर्शन निशा त्रिवेदीच्या टीमने केले होते.

Share Bazar : प्रॉफिट बुकिंगचा मोठा झटका, गुंतवणुकदारांना 2.80 लाख कोटींचा फटका

भारंगमचे कौतुक करताना सांस्कृतिक सचिव म्हणाले की, एनएसडीला अजून उंचीवर नेणे बाकी आहे. मुंबईत एनएसडीच्या वतीने भारंगमचे भव्य उद्घाटन झाले आणि आज ‘समुद्र मंथन’ या नाटकाने त्याची सांगता होत असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रमंथन हे सर्वात जुने नाटक आहे. आपली नाट्य परंपरा 25 हजार वर्षांची असल्याचे त्यांनी सांगितले.

एनएसडीचे अध्यक्ष परेश रावल म्हणाले की, देशाला जोडण्यासाठी रंगभूमी हे एक सशक्त माध्यम आहे आणि आम्ही तेच काम जन भारत रंगाने केले आहे. देशभरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाटके सादर होण्याची ही नाट्यसृष्टीच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे ते म्हणाले.

INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews

एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी म्हणाले की, आम्हाला नाटकाच्या माध्यमातून संपूर्ण देश जोडायचा आहे आणि प्रत्येक घरात नाटक असावे ही आमची इच्छा आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा उल्लेख करून ते म्हणाले की, नाटक हे समाजाला प्रत्येक संस्कृतीशी जोडण्याचे काम करते आणि याच अर्थाने ते समाजाचे रक्षण करणारे असते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube