INDIA आघाडीची बुडणारी जहाज प्रियांका गांधींनी सावरली; महिन्याभरानंतर मिळाली Goodnews
नवी दिल्ली : आधी बिहारमध्ये नितीश कुमार, मग पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, त्यानंतर दिल्ली, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी अन् शेवटी जम्मू-कश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला. असे एकपाठोपाठ एक पक्ष साथ सोडत असल्याने इंडिया आघाडीचे निवडणुकीपूर्वीच विसर्जन होणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र अखेरीस काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या मध्यस्थीनंतर इंडिया आघाडीला तब्बल महिन्याभरानंतर पहिली गुडन्यूज मिळाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्षाचा (Samajwadi Party) जागा वाटपाचा तिढा सुटला असून लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. (After the mediation of Congress leader Priyanka Gandhi, the rift between Congress and Samajwadi Party in Uttar Pradesh has been resolved.)
मागील अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची जागा वाटपाबाबत बोलणी सुरु होती. मात्र कोणताही अंतिम तोडगा निघू शकला नव्हता. 80 पैकी समाजवादी पक्षाने यापूर्वीच आपण 65 जागा लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर काँग्रेस आणि जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलाला 15 जागा देऊ असे सांगितले होते. त्यानंतरही काँग्रेससोबतची चर्चा पुढे जात नसल्याने समजावादी पक्षाने राष्ट्रीय लोक दलसोबतची चर्चा पुढे सरकवली. यात जयंत चौधरी यांना सात जागा देऊ केल्या होत्या. त्यामुळे काँग्रेससाठी केवळ आठ जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यानंतर आता काँग्रेसला 11 जागा देण्याबाबत प्रस्ताव दिला होता.
Lok Sabha Election : ‘यूपी’त आघाडी टिकणार; काँग्रेसच्या फॉर्म्यूल्याने जागावाटपाचा तिढा सुटला
मात्र अशातच इंडिया आघाडीचे काहीच ठरत नसल्याने जयंत चौधरी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर समाजवादी पक्षाने काँग्रेसला 17 जागांची ऑफर दिली होती. मात्र समाजवादी पक्षाने 2019 मध्ये जिंकलेल्या मुरादाबादच्या मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितल्याने जागा वाटपाचा तिढा सुटू शकला नव्हता. मात्र आता प्रियंका गांधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही पक्षांमधील बोलणी यशस्वी झाली आहे. काँग्रेसने मुरादाबाद जागेची मागणी सोडून त्याऐवजी सीतापूर, श्रावस्ती आणि वाराणसीची मागणी केल्याची माहिती आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
तिकीट कुणाला द्यायचे ते पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल, लोकांनी आकाशात पतंग उडवू नये; देवधरांनी फटकारले
काँग्रेसला कोणत्या 17 जागा मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसला रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाजियाबाद, देवरिया, बाराबंकी, मथुरा आणि सीतापूर मतदारसंघ मिळू शकतात. तर उर्वरित 63 जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढणार आहे. दुसऱ्या बाजूला बहुजन समाज पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती आहे. तिसऱ्या बाजूला भाजप 78 आणि अपना दल दोन जागांवर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सर्वच जागांवर तिरंगी लढत दिसणार आहे.