काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक, नागपूर येथे होणार अंत्यसंस्कार

Vijay Wadettiwar : राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी कमलाबाई वडेट्टीवार यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या दुपारी 3 वाजता नागपूर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांच्या कार्यलयातून देण्यात आली आहे.