संपत्तीच नाही, सोशल मिडीयासाठीही निवडावा लागणार वारस; जाणून घ्या प्रक्रिया…

How To Manage Facebook And Other Social Media Accounts After Death Know About Legacy Tools : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तेव्हा त्याची संपत्ती, बॅंक अकाऊंट यासह सर्व कायदेशीर गोष्टींचा वारस ठरलेला असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का?की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्सचं काय होतं? त्यामुळे आता संपत्तीच नाही तर सोशल मिडीयासाठी देखील वारस निवडावा लागणार आहे.
आमदार साहेब असं वागणं बरं नव्हे! संजय गायकवाड: शिवीगाळ, मारहाण, महापुरुषांचा अपमान आणि बरंच काही…
यासाठी आजकाल सोशल मिडीया कंपन्या लिगसी कॉन्टॅक्ट किंवा इनअॅक्टीव्ह अकाऊंट मॅनेजर यासारखे फिचर्स देते. ज्या द्वारे तुम्ही अगोदरच तुमच्या सोशल मिडीयाचा वारस ठरवू शकता. हे फिचर कसं वापरायचं किंवा लागू करायचं? जाणून घ्या सविस्तर…
लिगसी फिचर काय आहे?
लिगसी फिचर एक असा पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही अगोदरच ठरवू शकता की, तुमच्या मृत्यूनंतर तुमचं सोशल मिडीया अकाऊंट कोण हॅण्डल करणार? हे फीचर फेसबुक, गुगल , इन्स्टाग्रामसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
लिगसी कॉन्टॅक्ट काय आहे?
फेसबुक तुम्हाला तुमच्या नातलग किंवा जवळच्या व्यक्तीला लिगसी कॉन्टॅक्टमध्ये अॅड करण्याचा पर्याय देतं. ज्या व्यक्तीला तुम्हाला त्यामध्ये तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या सोशल मिडीयाचा वारस म्हणून निवडायचे आहे. त्याचा नंबर अॅड करू शकता. जेणे करून तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर देखील तुमचं अकाऊंट कुटुंबियांसाठी आठवणी म्हणून जपून ठेवू शकता.
तु आता तुझ्या बापाला घेऊन ये…बीडच्या सावकार अन् व्यावसायिकाची रेकॉर्डिंग व्हायरल
कसं सेट करायचं?
फेसबुकचं अॅप उघडा सेटिंग्स अॅन्ड प्रायवेसीमध्ये जा. येथे तुम्हाला सेटिंग पर्यायामध्ये मेमोरीयलायझेशन सेटिंगवर जा. येथे लिगसी कॉन्टॅक्ट निवडा.
गुगल अकाऊंटसाठी इनअॅक्टीव्ह अकाऊंट मॅनेजर –
गुगल तुम्हाला ही सुविधा देतं की, जर तुमचं अकाऊंट जास्त काळासाठी इनअॅक्टीव्ह राहिलं. तर गुगल ठरवतं की, तुमचा डेटा डिलीट करायचा की, तो कुणाला शेअर करायचा. तुम्ही त्यात हे देखील सेट करू शकता की, तुमचं अकाऊंट किती दिवस इनअॅक्टीव्ह राहिल्यास ते बंद केलं जावं. त्याबाबत कोणत्या लोकांना काय माहिती दिली जावी. की, तुमचं अकाऊंट कायमचं बंद केलं जावं.
अदानी पॉवरला वीज वितरण परवाने देऊ नका, महावितरणच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू नका : राजेश शर्मा
कसं सेट करायचं?
यासाठी गुगल अकाऊंटवर जा. डेटा आणि प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर मेक ए प्लॅन फॉर युवर डिजीटल लिगसीवर क्लिक करा. इनअॅक्टीव्ह अकाऊंट मॅनेजरला अॅक्टीव्ह करा.
इन्स्टाग्राम अकाऊंटसाठी मेमोरीयलायझेशन –
इन्स्टाग्राममध्ये तुम्ही लिगसी कॉन्टॅक्ट सेट नाही करू शकत.मात्र तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबातील लोक मृत्यू प्रमाणपत्र दाखवून अकाऊंट मेमोरीयलायझेशन करू शकता. यामध्ये अकाऊंटवर रिमेमबरिंगचा टॅग दिसेल. पण हे अकाऊंट कोणीही लॉगिन नाही करू शकत.
मुंबईत ३२ वर्षांच्या CA ची समलैंगिक संबंधांतून आत्महत्या: नेमकं प्रकरण काय?
डिजीटल लिगसीचा आवश्यकता काय?
जर तुम्हाला वाटत असेल की, डिजीटल लिगसीचा आवश्यकता काय? तर हे फिचर तुमच्या आठवणी, फोटो, पोस्ट सेफ ठेवू शकतं. तुमच्या डेटाचा गैरवापर होण्यापासून टाळू शकतो. तुमच्या कुटुंबाला तुमची माहिती आणि डेटा मिळू शकतो. सोशल मिडीया अकाऊंट्सची प्रायव्हसी कायम राहू शकते.