तु आता तुझ्या बापाला घेऊन ये…बीडच्या सावकार अन् व्यावसायिकाची रेकॉर्डिंग व्हायरल

Beed Crime : बीडमध्ये सावकारच्या जाचाला कंटाळू कापड व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याच प्रकरणातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Beed) फटाले आत्महत्या प्रकरणातील 3 कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून त्यामध्ये सावकार, डॉ. लक्ष्मण जाधव यांनी फटालेंसमोर अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केल्याचं उघड झालं आहे.
याप्रकरणी फटाले यांच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्यावर सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तीन आरोपींना 10 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि मयत राम फटाले यांच्या संभाषणाच्या दोन अतिशय धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग रात्री व्हायरल झाल्या होत्या. आता आणखी 3 रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. लेट्सअप मराठी या रेकॉर्डिंगची पुस्टी करत नाही.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही थांबेना; केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
याच प्रकरणात आज आणखी 3 कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. सदरील कॉल रेकॉर्डिंग मध्ये सावकार लक्ष्मण जाधव हा फटालेंना दम देत असल्याचे ऐकू येत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव हा फटाले यांच्याकडे पैशांची विचारणा करतो. त्यांचा संवाद खालीलप्रमाणे
सावकार – फटाले, पैसे कधी देणार ?
फटाले – काल बडोदा बँकेचा इश्यू होता. थोड्या वेळात टाकून देतो.
सावकार – आता मी तुझ्या घरी येतो. बँकेचा इश्यू होता ना, तुला आता इश्यू दाखवतो तू ये.. ( पुढे शिवीगाळ केली) तुझ्या बापाला घेऊन ये, नाहीतर मी आलो तुझ्या घरापाशी थांब.. अशाप्रकारे धमकावत सावकरा त्यांच्याशी बोलला.
दुसरं कॉल रेकॉर्डिंग
सावकार – काल मी तुला वडिलांना घेऊन यायला सांगितलं होतं ना.
फटाले – सर येतो, आठ साडेआठ वाजेपर्यंत येतो.
सावकार – पैसे किती टाकलेत ?
फटाले – दीड हजार रुपये..
सावकार – त्या दिवशीचे शंभर रुपये राहिले आहेत ना..
फटाले – माहिती आहेत, ते पण टाकतो..
सावकार – वडिलांना घेऊन ये..
तिसरं कॉल रेकॉर्डिंग
सावकार – लक्ष्मण जाधव हा म्हणतो किती पैसे टाकले ?
फटाले – पंधराशे रुपये टाकले आणि बाकीचे पैसे कालच टाकायला सांगितले होते.
सावकार – कोणाला टाकायला सांगितले होते ?
फटाले – मित्राला टाकायला सांगितले होते.
सावकार – कधी सांगितले होते टाकायला ?
फटाले – रात्रीच मी पैसे टाकले की लगेच
सावकार – असले धंदे करू नका बरं का.. नाहीतर घरी यावं लागेल मला.
फटाले – यायची गरज नाही. सावकार – टाका लवकर पैसे.. पाच मिनिटात पैसे आले पाहिजेत. तारीख माहीत असते सगळं माहीत असतं घुमवता उग.. त्याच्यापाशी मोबाईल आहे आणि याच्यापाशी मोबाईल आहे. किती वेळ लागेल अजून?
फटाले – फोन लावतो सर.
सावकार – फोन नका लावू पैसे किती वेळात येणार ?