बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही थांबेना; केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र काही थांबेना; केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही थांबायच नाव घेत नाहीत. (Beed) रोज एक घटना अशी परिस्थिती सध्याची आहे. येथील केज तालुक्यात एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेत जात असतांना, ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याने तिचा पाठलाग केला आणि ट्रॅक्टर घेवुन तिच्या पाठी मागुन जात तिला कट मारून पुढे गेला. तिच्या कडे पाहून हावभाव करून विनयभंग केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

एक वर्षा पासून पीडिता सहन करीत होती त्रास

ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे हा पीडित मुलगी ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत असल्या पासून तिचा पाठलाग करून स्कूल बॅग धरून ओढणे व तिच्या हाताला धरून ओढणे. कट मारून निघून जाणे. तसेच दहावीची परीक्षा देवू देणार नाही. या बाबत कोणाला सांगीतलेस तर तुला खल्लास करून टाकतो. अशी धमकी देत होता.

बीड जिल्ह्यातील आत्महत्या सत्र काही थांबेना; सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

पीडित मुलीने ऋषिकेश उर्फ सचिन याच्या पासून तिला होणाऱ्या त्रासाची कल्पना तिची आईला दिल्या वरून त्यांनी त्याच्या घरी जावुन त्याच्या आई-वडीलांना त्याला समजुन सांगणे बाबत सांगीतले होते. तसेच पीडित मुलीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पण या छेडछाडीचे कल्पना दिली. तरी तो तिला त्रास देत असे.

एकाच आठवड्यातील घटना

१) दि. २ जुलै रोजी एका गतिमंद तरुणीवर नानासाहेब चौरे गोठ्यात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.

२) दि. ४ जुलै रोजी दुपारी ३:०० च्या सुमारास एका दिव्यांग आणि गतिमंद असलेली तरुणी ही घरात एकटीच असताना बाळू कांबळे याने तिचा विनयभंग केला.

३) दि. ४ जुलै रोजी निखिल कांबळे याने नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा मोटार सायकल वरून पाठलाग करीत तीचा विनयभंग केला.

४) दि. ७ जुलै रोजी ऋषिकेश उर्फ सचिन गलांडे याने १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करून परीक्षेला न बसू देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube