बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला; परळी तालुक्यातील सिरसाळ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला; परळी तालुक्यातील सिरसाळ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Beed Crime : बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. (Crime) अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.

येथे शौचास गेलेल्या या अल्पवयीन मुलीचा हात धरून एका व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथील काही मजूर सध्या धारूर तालुक्यातील सुकळी परिसरात कामासाठी वास्तव्यास आहेत.

केबिनमध्ये बोलावून, बीड विनयभंग प्रकरणातल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर

सुकळी येथील पद्माकर रामगुडे नावाच्या व्यक्तीने याच मजुरांच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला शौचासाठी एकटे पाहून तिच्या पाठीमागून जाऊन तिचा उजवा हात धरला. वाईट हेतूने आणि मुलीला लाज वाटेल अशा पद्धतीने त्याने तिला ओढून तिचा विनयभंग केला.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 185/2025, कलम 74, 75 (1), 78 भा.न्या. सं. 2023 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम 8 व 12 नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube