जबरदस्त, इंटरनेटशिवायही करता येणार चॅटिंग, जॅक डोर्सी आणणार Bitchat; जाणून घ्या खासियत

जबरदस्त, इंटरनेटशिवायही करता येणार चॅटिंग, जॅक डोर्सी आणणार Bitchat; जाणून घ्या खासियत

Bitchat App : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युर्जससाठी काहींना काही नवीन फीचर्स लॉन्च करत असते ज्याचा मोठा फायदा युर्जसला देखील होत आहे. मात्र आता व्हॉट्सॲपला टक्कर देण्यासाठी एक नवीन ॲप येणार आहे. या ॲपच्या मदतीने युजर्स इंटरनेटशिवाय देखील चॅट करु शकणार आहे. माहितीनुसार, एक्स आणि ब्लाॅक सारख्या कंपन्यांचे संस्थापक जॅक डोर्सी(Jack Dorsey) बिटचॅट नावाचा ॲप लॉन्च करणार आहे. या ॲपच्या मदतीने युजर्स इंटरनेटशिवाय, मोबाईलनंबर शिवाय आणि ई-मेलशिवाय चॅट करु शकणार आहे. बिटचॅट (Bitchat) ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) तंत्रज्ञानावर काम करणार आहे.

बिटचॅट म्हणजे काय?

मोबाईल नंबर आणि इंटरनेटशिवाय काम करणारा बिटचॅट एक मेसेजिंग ॲप आहे. हे ॲप  पीअर-टू-पीअर मेसेजिंगला सपोर्ट करते. म्हणजेच एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलशी कनेक्ट करुन या ॲपच्या मदतीने युजर्स चॅट करु शकणार आहे.

बिटचॅट कसे काम करते?

बिटचॅट ब्लूटूथ मेश नेटवर्कद्वारे डिव्हाइस-टू-डिव्हाइस कनेक्शन तयार करते. हे नेटवर्क 300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर काम करते. मेसेज मल्टी-हॉप सिस्टमद्वारे पाठवले जातात, म्हणजेच, जर दोन डिव्हाइसेस दूर असतील तर मेसेज मधील उर्वरित मोबाइल डिव्हाइसद्वारे फॉरवर्ड केला जातो. मेसेज वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर तात्पुरत्या मेमरीमध्ये संग्रहित केला जातो आणि जर प्राप्तकर्ता ऑफलाइन असेल तर मेसेज नंतर डिलव्हर केला जातो.

बिटचॅट सेफ्टी

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: Curve25519 + AES-GCM अल्गोरिथमद्वारे डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो.

फोन नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही: यामध्ये मोबाइल नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही, म्हणजेच ते पूर्णपणे खाजगी आहे.

सर्व्हर नाही, केंद्रीय नियंत्रण नाही: कोणताही केंद्रीय सर्व्हर नाही, म्हणून ॲप  सेन्सॉरशिप-मुक्त आहे आणि नेटवर्क ब्लॉकिंगपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.

मेसेज सेव्ह सिस्टिम

या ॲपमध्ये एक मेसेज 12 तासांनंतर ऑटोमॅटिक डिलीट करण्यात येते मात्र जर युजर्सला एकादा मेसेज सेव्ह करायचा असेल तर तो मेसेज अमर्यादित काळासाठी सेव्ह करता येतो. जर रिसिव्हर उपलब्ध नसेल तर मेसेज सेव्ह करण्यात येतो आणि जेव्हा रिसिव्हर उपलब्ध होईल तेव्हा त्याला मेसेज पाठवण्यात येते.

बिटचॅट फीचर्स

या ॲपमध्ये तुम्हाला एका पेक्षाएक फीचर्स पाहायला मिळणार आहे. या ॲपमध्ये तुम्हाला चॅट रुम फीचर्स देण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही दुसऱ्या युजर्ससह चॅट करण्यासाठी चॅटरुम तयार करु शकतात. याचबरोबर कोणत्याही खाजगी चॅटसाठी पासवर्ड तयार करु शकतात. तसेच नेटवर्कशिवाय मेसेज पाठवण्याचा पर्याय युजर्सला उपलब्ध करुन देण्यात आला आहे आणि यासाठी कोणत्याही अकॉउंटची किंवा आयडीची आवश्यकता नसणार आहे.

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या हे ॲप  Apple TestFlight द्वारे iOS वापरकर्त्यांसाठी बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आले असून पुढील काही दिवसात अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील ॲप लॉन्च करण्यात येणार आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी ॲप  लॉन्च झाल्यानंतर याचा मोठा फटका व्हॉट्सॲपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube