व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! टेलीग्रामलासारखे मेसेज पिन करता येणार

व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! टेलीग्रामलासारखे मेसेज पिन करता येणार

WhatsApp Pin Message Feature: WhatsApp यूजर्ससाठी मोठी खुशखबर आहे. Meta लवकरच व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर ॲड करणार आहे. या नवीन फीचरमुळे व्हॉट्सॲप यूजर्स चॅटमध्ये मेसेज पिन करू शकणार आहेत. यूजर्स लेटेस्ट फीचर अँड्रॉइड व्हॉट्सॲप बीटा अॅपमध्ये वापरू शकतील. या फीचरद्वारे, वापरकर्ते ठरवू शकतील की त्यांना संदेश किती काळ पिन म्हणून ठेवायचा आहे. हे फीचर Telegram अॅपमध्ये आधीच उपलब्ध आहे.

व्हाट्सॲपशी संबंधित माहिती ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo या पब्लिकेशननुसार, मेसेज पिन ड्यूरेशन फीचरद्वारे ठराविक कालावधीनंतर मेसेज अपोआप अनपिन केला जाईल. सध्या यूजर्स 24 तास, 7 दिवस किंवा 30 दिवसांपर्यंत संदेश पिन करू शकतात. परंतु डिवेलपर्स सर्वसामान्यांसाठी हे फिचर उपलब्ध करून देताना अधिक पर्याय देऊ शकतात. स्क्रीनशॉट पाहिल्यास हे लक्षात येईल की यूजर्स त्यांच्या आवश्यकतेनुसार कोणताही संदेश अनपिन करु शकतात.

Mahesh Manjrekarनी आकाशसाठी स्वतः बनवलं जेवण; लेकाच्या हॉटेलात रंगला बेत, Video Viral 

व्हाट्सॲपवर चॅटींग करताना यूजर्स पाहिजे तो मेसेज सहजपणे मेसेज पिन करु शकतात. असे केल्याने, मेसेज शोधण्यासाठी चॅटवर परत जाण्याची आवश्यकता नाही आणि आवश्यक असल्यास ते सहजपणे ऍक्सेस केले जाऊ शकते. सध्या, चॅट किंवा ग्रुपमध्ये मेसेज किती काळ पिन ठेवला जातो या फिचरवर काम सुरू आहे. बीटा यूजर्स हे फीचर लवकरच वापरु शकणार आहेत, परंतु सामान्य लोकांसाठी या फिचरच्या उपलब्धतेशी संबंधित कोणतीही माहिती नाही.

WhatsApp

WhatsApp

यापूर्वी अलीकडेच, व्हाट्सएपने स्पॅम नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करण्यासाठी एक फिचर लॉन्च केले होते. याशिवाय, व्हॉट्सॲप चॅनेल फीचर देखील वन-वे ब्रॉडकास्ट मेसेजसाठी आणले होते. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना एचडी क्वॉलिटी फोटो पाठवण्याचा पर्याय मिळाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube