Mahesh Manjrekarनी आकाशसाठी स्वतः बनवलं जेवण; लेकाच्या हॉटेलात रंगला बेत, Video Viral 

Mahesh Manjrekarनी आकाशसाठी स्वतः बनवलं जेवण; लेकाच्या हॉटेलात रंगला बेत, Video Viral 

Akash Thosar Share Video: मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Directed by Mahesh Manjrekar) हे सतत काहींना काही कारणांनी प्रसिद्धी झोतात येत असतात. गेल्या काही महिन्यापासून त्यांचा मुलगा सत्याने (Satya Manjrekar) नव्या हॉटेलची सुरुवात केली आहे. सत्याच्या या हॉटेलचे अनेकजण मोठ्या प्रमाणात कौतुक करत असल्याचे दिसून आले आहे.

mahesh manjrekar cooking 1

आता अभिनेता आकाश ठोसरने (Akash Tosar) देखील सत्य मांजरेकरांच्या हॉटेलमधील तो व्हिडीओ शेअर (Video Viral) करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वत: महेश मांजरेकर हे जेवण बनवत असल्याचे दिसून येत आहे. महेश मांजरेकरांचा मुलगा सत्याने गेल्या काही दिवसाअगोदरच मुंबईच्या उपनगरात गोरेगाव या ठिकाणी स्वत:चे हॉटेल सुरु करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Satya Manjrekar (@satyamanjrekar)


‘सुका सुखी’ असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. (Suka Sukhi Hotel) या हॉटेलला नुकतंच आकाशने भेट दिली आहे. त्यावेळेचा तो व्हिडीओ आकाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये महेश मांजरेकर हे ‘सुका सुखी’ या हॉटेलच्या किचनमध्ये जेवण बनवत असल्याचे दिसून येत आहे. महेश मांजरेकर हे पदार्थाचा योग्य अंदाज घेत अगदी चविष्ट भाजी बनवत असल्याचे दिसून आले आहेत.

Majha Sonyacha Tukda: भरपावसाळ्यात प्रेमाचं वर्षाव करणारं अस्सल मराठमोळं गाणं रिलीज ! एकदा पाहाच…

खरे तर आकाशने मांजरेकरांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणावर चांगलाच ताव मारल्याचे बघायला मिळाले आहे. बटाट्याची भाजी, वालाचं बिरडं, गवारची भाजी, चपाती, डाळ अशा विविध प्रकारचे पदार्थांची चव आकाशला चाखायला भेटले आहे. त्याला मांजरेकरांच्या ‘सुका सुखी’ हॉटेलमधील जेवणाची चव आवडल्याचे सांगत ‘मस्ट ट्राय’ असे लिहिले आहे. तसेच सत्याच्या या हॉटेलमध्ये आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी अस्सल मालवणी पदार्थांचा चांगलाच आस्वाद घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube