माढा लोकसभेची निवडणूक सोपीच; चंद्रकांत पाटलांनी मांडले संपूर्ण गणित

माढा लोकसभेची निवडणूक सोपीच; चंद्रकांत पाटलांनी मांडले संपूर्ण गणित

Chandrakant Patil On Madha Loksabha Election: भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी एका बैठकीमध्ये सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक (Madha Loksabha Election) जास्त कठीण असल्याचे विधान केले होते. त्याची क्लिप सोशल मीडियामध्ये (social media) व्हायरल झाली आहे. त्यावरून वादही निर्माण झाला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी लेट्सअप मराठी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता माढा लोकसभा भाजपसाठी (BJP) अवघड नाहीतर खूप सोपी असल्याचे त्यांनी म्हटले आहेत. तसेच संपूर्ण मतदारसंघाचे गणितही त्यांनी मांडले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, काल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा विधानसभेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या बैठकीत मांडणी करताना मी असे म्हटले की धैर्यशील मोहिते यांनी बंडखोरी केल्याने आपल्याला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. पण हे म्हणत असत मी अवघड आहे असे कसे म्हणेल.

सहा विधानसभांपैकी पाच विधानसभांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते यांचे घर येते. त्या विधानसभा मतदारसंघात राम सातपुते हे आमदार आहेत. करमाळा येथील अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे अजित पवार यांच्याबरोबर आहे. ते वर्षांन वर्ष आमदार राहिले ते जयंतराव जगताप हे भाजपबरोबर आहेत. त्याच मतदारसंघातील रश्मीताई बागल हे आमच्याबरोबर आहे. चिवटे कुटुंब हे आमच्याबरोबर आहे. माढामध्ये बबनराव शिंदे हे आमदार आहेत. सांगोल्यामध्ये शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे आमच्याबरोबर आहेत.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकनाना साळुंके हे बरोबर आहेत. माण- खटाव हे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. फलटणमध्ये रामराजे निंबाळकर हे अजितदादांबरोबर आहेत. त्यांचे काही म्हणणे आहे. स्वतः खासदार रणजितसिंह निंबाळकर हे फलटण विधानसभेतील आहे. विधानसभेला भाजपचा उमेदवार हरला असले तरी मते खूप मिळाली आहेत.

मागील वेळी ताकदीने आपल्याबरोबर असलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी वेगळी वाट धरल्याने आम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागेल, असे मी म्हटलो आहे. गेल्या वेळी विरोधी उमेदवार राहिलेले संजयमामा शिंदे हे आता आमच्याबरोबर आहेत.

गेल्या वेळी बबनराव शिंदेबरोबर नव्हते. ते आता आपल्याबरोबर आहेत. लोकसभेला शहाजीबापू पाटील हे आमदार नव्हते. ते आता आपल्याबरोबर आहेत. हे सगळे आमदारबरोबर असल्याने निवडणूक सोपी झाली आहे. तरीही सतर्क जे असतात नेते त्यांनी हेच म्हणाचे असते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज