शिवसेना, राष्ट्रवादी मुलगा व मुलीवरील प्रेमामुळेच फुटली; अमित शाहांचा पुन्हा ठाकरे, पवारांवर निशाणा

  • Written By: Published:
शिवसेना, राष्ट्रवादी मुलगा व मुलीवरील प्रेमामुळेच फुटली; अमित शाहांचा पुन्हा ठाकरे, पवारांवर निशाणा

Bhandara lok Sabha Amit Shah Sabha : महायुतीचे भंडारा-गोंदिया (Bhandara Loksabha) लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी साकोली येथे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Udhav Thackeray) यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना फुटलेली नाही. उद्धव ठाकरेंच्या मुलावरील प्रेमामुळे शिवसेना फुटली, तर शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली असल्याची टीका अमित शाह यांनी केली आहे.


इंडिया आघाडी कुणी दिल्लीकडे कुणी बारामतीकडे खेचतय, ती विना डब्ब्यांची ट्रेन; फडणवीसांचा टोला

शरद पवार हे दहा वर्ष केंद्रात मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रात काय दिले आहे. केवळ एक लाख कोटी रुपये दहा वर्षांत दिले आहेत. नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत सात लाख कोटीहून अधिक निधी दिला आहे. त्या व्यतिरिक्त रस्ते, रेल्वेसाठी ही निधी दिला असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.

शरद पवारांचे माढ्यात दोन धक्के; मोहिते पाटलांसह शिंदे गटाचा नेता हाती घेणार ‘तुतारी’


एक रुपया, मीठाची पुडी देऊन बाबासाहेबांचा पराभव केला

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन मते मागण्यासाठी काँग्रेस घरोघरी जात आहे. पण याच काँग्रेसने 1952 आणि 1954 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावली होती. त्यावेळी मतदारांना एक रुपया आणि मीठाची पुडी देऊन काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले. काँग्रेसचे पाच दशके सरकार होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. त्यानंतरही बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसकडून उपमान करण्यात आला. भाजपने आंबेडकरांच्या पाचही तीर्थस्थानांना सन्मानित केले आहे. बाबासाहेब नसले तर खोटी बोलवून त्यांचे स्पिरिट संपवून काम काँग्रेस करत आहे.

आरक्षण हटविणार नाही आणि हटवून देणार नाही.

आता ते भाजपला बदनाम करत आहेत. चारशे जागा मिळाल्यानंतर भाजप आरक्षण संपवून टाकणार आहे. मोदी हे दोन टर्मपासून बहुमताने पंतप्रधान आहेत. बहुमताचा उपयोग आम्ही कधीच आरक्षण हटविण्यासाठी केला नाही. बहुमताचा उपयोग कलम 370, ट्रिपल तलाख संपविण्यासाठी केला आहे. भाजप आरक्षण हटविणार नाही आणि हटवून देणार नाही. ही मोदींची गॅरंटी असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज