देवेंद्रजी तुमची काय लायकी? उद्धव ठाकरे कडाडलेच…

देवेंद्रजी तुमची काय लायकी? उद्धव ठाकरे कडाडलेच…

Udhav Thackeray On Devendra Fadnvis : देवेंद्रजी तुमची काय लायकी? तुमच्याबद्दल काय बोलावं मला टरबुज्याचा, कुत्र्याचा अपमान करायचा नाही, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभरात जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटाची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

भाजपचं काम अपूर्णच, पूर्ण करा नाहीतर मला बोलवा; वागळे प्रकरणी राणेंच्या खुलेआम सूचना

उद्धव ठाकरे म्हणाले, तुमच्याकडे भेकडांची, गद्दारांची फौज मर्द मावळ्यांशी लढा देऊ शकत नाही. भाजपमध्ये जराही मर्दपणा असेल तर तुमच्या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि खुल्या मैदानात समोरासमोर या पाहु कोणाच्या पाठिला माती लागते, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुलं आव्हानच दिलं आहे. तसेच बिहारमध्ये आज नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. विरोध केला तर तेजस्वी यादवांच्या घरी पोलिस घुसवले आमदारांना शोधण्यासाठी, उद्या आमचंही राज्य येणार आहे तेव्हा बघून घेईल. तुम्ही ईडी कारवाया करतायं हे कोणतं हिंदुत्व आहे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

भाजपमध्ये सर्व भाडोत्री, काही दिवसांनी त्यांचा अध्यक्षही कॉंग्रेसमधून आलेला असेल; ठाकरेंचे टीकास्त्र

तसेच शिवरायांनी समोरासमोर लढा दिला होता. शिवरायांनी कधीच मित्राला दगा दिलेला नाही आमचं तसं हिंदुत्व नाही. रविंद्र वायकरांनाही ऑफर दिलीयं एकतर भाजपमध्ये या नाहीतर तुरुंगात जा. आमचं हिंदुत्व भाजपने जन्माला घातलं नाही. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस बेगुमानपणे म्हणतात की अरे उद्या गाडीखाली कुत्र आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल अहो देवेंद्रजी तुमची काय लायकी? तुमच्याबद्दल काय बोलावं शब्दच सुचत नाही मला टरबुज्याचा अपमान करायचा नाहीये आणि कुत्र्याचाही नाही. एकीकडे गुरांचं नूकसान झालं की आमचा आमदार शेतकऱ्याच्या घरी जातो अन् दुसरीकडे गाडीखाली कुत्रा आला तरी म्हणणारा हा नालायक नादान गृहमंत्री कुठे? या शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले आहेत.

राज्यातील मुस्लिम समाजही माझ्यासोबत आला आहे. त्यांना माहित नाही का माझ्या हाती भगवा झेंडा आहे आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. माझ्या आजोबांनी वडीलांनी दुसऱ्या धर्माचा कधी द्वेष शिकवला नाही. जो कोणी देशद्रोही असेल तर तो कोणी जरी असला तरी त्याला फासावर लटकवा हे आमचं हिंदुत्व, असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज