भाजपमध्ये सर्व भाडोत्री, काही दिवसांनी त्यांचा अध्यक्षही कॉंग्रेसमधून आलेला असेल; ठाकरेंचे टीकास्त्र
Uddhav Thackeray : राज्यात काँग्रेसला पुन्हा एक मोठा झटका बसला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांना राज्यभेची उमेदवारी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. भाजपमध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत अससल्यचाी टीका ठाकरेंनी केलीय.
‘नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून मोठ्या प्रमाणात सोडचिठ्ठी’, आशिष देशमुखांची खोचक टीका
आज एका कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले, काही काळापूर्वी अशोक चव्हाण भाजपात गेल्याची बातमी कानावर आली होती. आता मी बघणार आहे की, निवडणूक आयोग म्हणून दिल्लीत एक लबाड संस्था बसलीये, तिने शिवसेना चोराच्या हाती दिली. राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आहे. आता काँग्रेसही अशोक चव्हाणांच्या हातात देतात की, काय ते पाहणार आहे. कारण निवडणूक आयोग काहीही करू शकतो, असं ठाकरे म्हणाले.
Vishwajeet Kadam म्हणतात आपण राजीनामा दिला नाही पण कॉंग्रेसमध्ये राहण्यावर थेट उत्तर नाही
ते म्हणाले, भाजपचे लोक रोज दंड थोपटत आहेत. मात्र बेडकुळ्या काही येत नाहीत. त्यांना बेडकुळ्या भाड्याने घ्याव्या लागतात. मोदींनी नुकतेच संसदेत भाषण केले. त्यात म्हणाले की, अबकी बार एवढे पार… एवढी भाजपची ताकद असेल तर मग फोडाफोडी का करताय? तुमच्यात आत्मविश्वास नाही का? आणि वर 400 पारच्या घोषणा करत आहेत. तुम्ही 400 सोडा, तुम्ही 40 चा आकडाही पार करू शकणार नाही. त्यामुळंचं नितीशकुमारांना सोबत घेतलं, इकडे अशोक चव्हाण, अजित पवारांना घेतलं. त्या मिंधेला घेतलं. त्याऐवजी गेली 10 वर्षे प्रामाणिकपणे काम केले असते तर आज भाजपवर ही वेळ आली नसती, असंही ठाकरेंनी सुनावलं
Vishwajeet Kadam म्हणतात आपण राजीनामा दिला नाही पण कॉंग्रेसमध्ये राहण्यावर थेट उत्तर नाही
भाजप सर्व भाडोत्री लोकं पक्षात घेत आहे. बाजारबुणगे घेतले जात आहेत. आणि भाजपमधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत. त्या निष्ठावंतांच्या बोडक्यावर या बाजारबुजण्यांगा बसवलं जात आहे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काँग्रेसमुक्त भारत होता. पण आता एवढे सर्व काँग्रेसवाले भापज पक्षात घेतलंय की, कॉंग्रेसव्याप्त भाजप अशी त्यांची परिस्थिती झाली. आणखी काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधूनच आलेला असेल, असा दावाही ठाकरेंनी केला.