LokSabha Election! उद्धव ठाकरेंची तोफ विखेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार…
LokSabha Election : राज्यात येत्या काळात लोकसभा (LokSabha Election) तसेच विधानसभा निवडणुका या होणार आहे त्यानुषंगाने आता राजकीय नेतेमंडळींच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसीय नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. 13 आणि 14 फेब्रुवारीला या दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यादरम्यान ते शिर्डी लोकसभेच्या अनुषंगाने नेतेमंडळी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. ठाकरे हे या दोन दिवसात शिर्डी लोकसभा (Shirdi LokSabha) मतदार संघ पिंजून काढणार आहे. तसेच ते सहाही विधानसभा मतदारसंघात मेळावे घेणार आहेत. विशेष म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे येणार असल्याने या दौऱ्याला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
येत्या काळात निवडणूक या होणार असल्याने राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी गावपातळीवर कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेत संवाद साधत आहे. यातच ठाकरे गटाकडून संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. मंगळवारी (ता.13) रोजी शनिशिंगणापूर दर्शन व त्यानंतर सकाळी 11 वाजता सोनईत आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत त्यांचा संवाद मेळावा होणार आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘भावी मुख्यमंत्री’ थोरातांना माझ्या शुभेच्छा; सुजय विखेंचा मिश्किल टोला
शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते पायाला भिंगरी लावून राज्याचा दौरा करत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकापाठोपाठ संवाद दौरे नगर जिल्ह्यात हे होणार असल्याने शिर्डीतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. उद्धव ठाकरे हे मंगळवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. सोनई येथे मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे देखरेखेखाली संवाद मेळावा पार पडणार आहे. तर ठाकरेंच्या ‘संवाद सभे’पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेर येथे सोमवारी ‘शिवसंवाद’ दौऱ्यावर येत आहेत.
अजितदादांनाच 2024 मध्ये मुख्यमंत्री करायचं; युवा मेळाव्यात धनंजय मुंडेंचं उद्दीष्ट ठरलं
शिवसेना फुटीनंतर खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदेंच्या शिवसेनेत असून ते शिर्डीचे विद्यमान खासदार आहेत. एकीकडे असे असले तरी दुसरीकडे मात्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना ठाकरे गटाकडून संभाव्य उमेदवार असल्याचे बोलले जातंय. गेल्या दोन पंचवार्षिक पाहिले असता 2014 आणि 2019 मध्ये शिवसेना- भाजप युतीकडून सदाशिव लोखंडे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसे पाहिल्यास भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला शिर्डीत पहिला विजय मिळवून दिला आहे. आता शिवसेनेत फूट पडली आहे. शिर्डीची जागा पुन्हा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शड्डू ठोकला आहे. यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना, असा सामना रंगणार असे चित्र आहे.
भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन : फरार रणजीत यादवला अटक
असा असणारा ठाकरेंचा जिल्हा दौरा
उद्धव ठाकरे सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून नऊ वाजता शनिशिंगणापुराकडे रवाना होणार आहे. सोनाई येथे संवाद मेळावा पार पडल्यांनंतर ते राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमास जातील. श्रीरामपूर व राहाता येथे संवाद मेळावा करुन ते शिर्डीत मुक्काम करणार आहेत. बुधवारी (ता.14) रोजी कोपरगाव, संगमनेर व अकोले येथील संवाद कार्यक्रम करुन सायंकाळी शिर्डी येथून विमानाने मुंबईला जाणार आहेत.