‘भावी मुख्यमंत्री’ थोरातांना माझ्या शुभेच्छा; सुजय विखेंचा मिश्किल टोला

  • Written By: Published:
‘भावी मुख्यमंत्री’ थोरातांना माझ्या शुभेच्छा; सुजय विखेंचा मिश्किल टोला

अहमदनगर – राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर झळकण्याच्या घटना सतत घटत असतात. कार्यकर्ते, उत्साही पदाधिकारी यांच्याकडून आपापल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकवण्यात येत असतात. नुकतेच माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून एक बॅनर झळकला होता. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या लोकांचे आजवर भावी म्हणून पोस्टर झळकले आहेत, ते ते कधीच त्या पदावर पोहचू शकले नाही. असा माझा राजकीय अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विखे यांनी दिली.

Sonal Chauhan : बोल्ड आणि ब्युटीफुल ‘जन्नत’ फेम सोनल चौहानच्या ग्लॅमरस अदा 

राज्यातील महायुती सरकारने केलेली कामे जनतेतील घटकांपर्यंत पोहोचविणे तसेच लाभार्थ्यांना प्रत्येक घटकांचे लाभ मिळावे या अनुषंगाने भाजपच्यावतीने गाव चलो अभियान राबवण्यात आले आहे. नुकतेच सुजय विखे यांच्यावतीने नगर तालुक्यातील वाळकी येथे हे अभियान राबवण्यात आले. यावेळी विखे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पत्रकारांशी बोलताना विखे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 2024 ला परत एकदा देशाला नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवे आहेत. एनडीए 400 पेक्षा जास्त जागा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘जे बोलतो ते करतोच…!’ अविर्भाव धीरज घाटेंना महागात : पुणे भाजपला केंद्रीय नेत्यांनी झाप-झाप-झापले

गेल्या काही दिवसांत राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्या. यावरही विखेंनी भाष्य केलं. यातील बहुतांश घटना व्यक्तिगत वादातून झाल्या आहेत. अशा घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन काम करत आहे, असं विखे म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले. याबाबत विखेंनाविचारण्यात आले असते ते म्हणाले, मधल्या काळात हे भावी पदाचं फॅड तयार झाले आहे. आजकाल भावी सरपंच, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी आमदार, भावी खासदार, भावी मंत्री, भावी मुख्यमंत्री असे पोस्टर सर्रास लागलेले दिसत असतात. मात्र ज्या ज्या लोकांचे भावी पोस्टर लागेत, ते व्यक्ती आजवर त्या पदावर पोहचू शकले नाही. हा माझा व्यक्तिगत राजकीय अनुभव आहे. बाकी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा मिश्किल टोला देखील यावेळी खासदार सुजय विखे यांनी लगावला.

तर राम शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तुम्ही ओरबडून सत्ता मिळवली होती. पण, आता माणसे सांभाळतांना तुमची धांदल उडाली आहे. देशात विरोधी पक्षनेते देता येईल, एवढी देखील संख्या तुमच्या पक्षाला गाठता आली नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube