‘गुन्हेगारांवर सरकारचा धाक राहिला नाही’; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

‘गुन्हेगारांवर सरकारचा धाक राहिला नाही’; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

Balasaheb Thorat News : मुंबईत अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली ती हत्या किती थंड डोक्याने करण्यात आली याचा अर्थ असा होतो की सरकार म्हणून धाक राहिलेला नाही यापूर्वी एका राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भाजपाच्या आमदाराने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहकारी पक्षाचे आमदारावर गोळीबार करतो याचा अर्थ असा होतो गुन्हेगारांवर सरकारचा दाक राहिला नाही किंबहुना राज्यकर्तेच गुन्हेगार होत आहे किंवा राज्यकर्त्यांचे सहकारी जेव्हा गुन्हेगार होत आहे याचा अर्थ असा होतो देशात आणि राज्यात धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे या विरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat News) यांनी वक्तव्य केलं आहे.

राहुरी येथील राजाराम आणि मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील दिवाणी आणि सत्र न्यायालयातील वकील संघटनेसह कनिष्ठ न्यायालयांतील वकिलांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज कोर्ट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर वकिलांनी मोर्चा काढला आहे.

कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे कन्या राशीचा आजचा दिवस

या मोर्चात सहभागी होण्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आले आहेत आढाव यांची हत्या ही मानवतेला काळिमा फासणारी आहे वकिली व्यवसाय करताना अनेक वकील हे आरोपींचे वकीलपत्र घेत असतात त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना कुठलाही संरक्षण नाही म्हणून शासनाने वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

थोरात म्हणाले, राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे. सरकारमध्ये तीन लोकं झाले आहेत, एक आहेत मुख्यमंत्री, दुसरे माजी मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेले आणि तिसरे एक उपममुख्यमंत्री. त्यांच्यातच मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे जनतेकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नाहीये. अपयशाचं मूळ कारण हेच आहे, त्यांची महत्वकांक्षा त्यांच्या सत्तास्पर्धा हे सगळे पाहुन वाटतं की ते जनतेच्या हितासाठी नाहीतर सत्तेसाठीच गेले असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Pune Metro : नदी पात्रांच्या भुयारातून धावली मेट्रो; बुधवारपेठ, मंडई, स्वारगेट कशी आहेत स्थानकं?

महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांमध्ये सध्या भाजपला पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो, याचा विचार सुरु आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा सुरु झालेली नाही. जागांच्या संख्यांबाबत कोणता उमेदवार निवडून येईल या चर्चेवर आम्ही अधिक भर देत असल्याचंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.

सर्वे कोणी केलायं यापासून सुरुवात आहे. मीही सर्वे करु शकतो माझा चांगला सर्वे. सगळी जनता काय चाललंय हे पाहत आहे. देशात असंतोष आहे अनेक कारणांमुळे अशावेळी पॉझिटिव्ह सर्वे स्वत:चा करुन घेणं शक्य असतं, तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी ते करीत असतील पण इंडियाचंच सरकार येणार राज्यात 48 मध्ये जास्तीतजास्त निवडून येण्यासाठी आम्ही काम करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज