live now
MNS MVA Satyacha Morcha : आजच्या मोर्चाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली : पवार
मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मोठा मोर्चा काढत आहेत
MNS MVA Satyacha Morcha Live Updates : मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मोठा मोर्चा काढत आहेत. ‘सत्याचा विराट मोर्चा’ असे या आंदोलनाचे नाव असून, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर विरोधी नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे लाईव्ह अपडेट्स देणारा लेट्सअपचा ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
सत्तेचा गैरवापर केला जातोय शरद पवार यांचा आरोप
लोकशाही संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली असून, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावे लागेल असे आवाहन करत निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर केला जातोय असा गंभीर आरोप पवारांनी केला. आजच्या एक जुटीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आठवली असे शरद पवार म्हणाले. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत.
-
माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज - उद्धव ठाकरे
माझ्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासादेखील उद्धव ठाकरें यावेळी केला. सगळे पुरावे घेऊन न्यायल्यात जाणार असून, न्याय मिळेल अपेक्षा आहे. जनता तुमचा निर्णय करेल असा इशारा देत आम्ही एकत्र तुमच्यासाठी आलोय असून, हिंदूंसाठी एकत्र आलोय असे सांगत मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्या शिवाय राहणार नाही असा गर्भित इशाराही ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला. मोर्चात सर्व आले. पण सत्ताधारी आले नाही असेही उद्धव यांनी लक्षात आणून दिले.
-
तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, उद्धव ठाकरेंचं CM फडणवीसांना जाहीर आव्हान
तुम्ही आमचा पर्दाफाश कराच असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. मुख्यमंत्री बोलत आहेत त्यानुसार त्यांनी मतचोरी होत असल्याचं मान्य केलं आहे असं ते म्हणाले आहेत. किती पुरावे द्यायचे, राजने तर डोंगरचं आणलाय, पक्ष आणि माझे वडीलही चोरतायत. घोटाळ्याच्या अॅनाकोंडाला कोंडावेच लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. मत चोर दिसेल त्याला लोकशाहीच्या मार्गाने फटकावा असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपला पक्ष चोरला, नाव चोरलं, निशाणी चोरली माझे वडील चोरी करायचा प्रयत्न झाला आणि ते पण पुरलं नाही म्हणून आता मतचोरी करत आहेत. मुख्यमंत्री जेव्हा असं बोलत आहेत त्याचा अर्थ त्यांनी मतचोरी मान्य केली आहे.
-
दुबार तिबार आले तर, फोडून काढा मग पोलिसांनाकडे द्या
काढ ते कापड असे सांगत राज ठाकरेंनी हे राज्यातील दुबार मतदार आहे पहा. एव्हढं दाखवूनदेखील जी माणसं भरली आहे ना त्यांच्यात निवडणूक आटोपती घेऊन निवडणूक जिंकायची आहे. पैठणचा आमदार मुलगा सांगतो 20 हजार बाहेरून आणले. मी 2017 पासून सांगतो मतचोरी झाली आहे. जेंव्हा निवडणूक होतील तेंव्हा सर्वांच्या घरी जा मतदार यादीतील लोकं ओळखा आणि जर दुबार तिबार आले तर, फोडून काढा मग पोलिसांनाकडे द्या तेव्हाच त्यांना कळेल असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. मतदारांनी मतदान करायचं, सगळं करायचं, पण मॅच अगोदरचं फिक्स असेल तर निवडणुकीला काय अर्थ आहे.
-
'सत्याचा मोर्चा'मध्ये राज ठाकरेंचा हल्लाबोल
आजचा मोर्चा राग, ताकद दाखवण्यासाठी आहे. दिल्लीला समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे, मतदार यांद्यामध्ये दुबार मतदार आहेत. आम्ही सगळे बोलतो यात दुबार मतदार आहे. एव्हढचं नाही तर, भाजप, शिंदेचे नेते अजित पवारांचे लोक बोलतंय दुबार मतदार आहे. मग निवडणूक घेण्याची घाई कोणची असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. 4500 मतदार आहे कल्याण भिवढी यांनी मलबार हिल मतदार संघात मतदान केले असे सांगत राज ठाकरेंनी मंचावर ठेवलेलं उचलं रे ते कापड असे सांगत दुबार मतदारांच्या याद्यांचे गठ्ठे दाखवले.
-
निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल
लोकशाही, राज्यघटना वाचविण्यासाठी सत्याचा मोर्चा यासाठी आलेला असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आपले नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, काँग्रेस विजय वडेट्टीवार आणि मित्र पक्ष नेत्यांचा हा अभूतपूर्व मोर्चा आहे. निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग आणि त्यांना चालवणाऱ्या विरोधात मोर्चा असल्याचे सांगत थोरात म्हणाले. राहुल गांधी यांना EC जे धातूर मातुर उत्तर दिले हे इतिहासत नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल असेही थोरात म्हणाले. स्थानिक स्वराज्य निवडणूकिला या मतदार यादीचा वापर करू नका.
-
विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय?

-
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात, बडे नेते सहभागी
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार सहभागी झाले आहेत. या मोर्चात चले जाव भाजपा अशी घोषणा असणारे फलक दिसत आहेत. सोबतच या मोर्चात भाजापा, मतचोरीविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
