इंडिया आघाडी कुणी दिल्लीकडे कुणी बारामतीकडे खेचतय, ती विना डब्ब्यांची ट्रेन; फडणवीसांचा टोला

इंडिया आघाडी कुणी दिल्लीकडे कुणी बारामतीकडे खेचतय, ती विना डब्ब्यांची ट्रेन; फडणवीसांचा टोला

Devendra Fadanvis criticize India Alliance : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) भाजप उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान इंडिया आघाडी ( India Alliance ) आणि राहुल गांधींवर ( Rahul Gandhi ) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही सर्वजन स्वतःला इंजिन समजत असलेली विना डब्ब्यांची ट्रेन आहे. ती कुणी दिल्लीकडे तर कुणी बारामतीकडे खेचत आहे. असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.

मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा राज्यभर परिणाम; शरद पवारांचा मोठा दावा

आज (14 एप्रिल) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि भाजप जोरदार प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान केंद्रातील भाजप नेत्यांची फौज सध्या राज्यामध्ये प्रचार सभा घेत आहे. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भंडाऱ्यातील साकोली या ठिकाणी सभा झाली. या सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्र सोडलं.

तिकीटासाठी गोडसेंची धावाधाव; भुजबळ म्हणतात, जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत…

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या देशामध्ये एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे घटक पक्ष आहेत. तर त्यामुळे नरेंद्र मोदी हे इंजिन आणि सर्व घटक पक्ष हे बोगी आहेत. ज्या विकासाच्या ट्रेनमध्ये सर्व समाज घटकांना सामावून घेतलं जात आहे. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या ट्रेनला केवळ इंजिनच आहे आणि इंजिनमध्ये कुणालाही बसता येत नाही तेथे डब्बेच नाहीत.

एकदा चुक केली आता पुन्‍हा करु नका… लंकेंना टोला लगावत विखेंचे पारनेरकरांना आवाहन

तसेच तिथे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद हे सर्वच जण म्हणतात मी इंजिन आहे. हे सर्व विरुद्ध दिशेला हे इंजिन खेचत आहेत. कोणी दिल्लीकडे तर कोणी बारामतीकडे, मुंबईकडे तर कोणी कलकत्त्याकडे ओढतो आहे. त्यामुळे त्यांचे इंजिन जागेवरनं हलतच नाही. अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी आलेले आहेत.

Iran vs Israel Military Power: इराण – इस्रायलमध्ये युद्ध पेटलं तर कोणाकडे किती लष्करी ‘पावर’ ?

त्यामुळे मोदी यांच्या विकासाच्या गाडीत बसून आपल्याला पुढे जायचं आहे. काल राहुल गांधी या ठिकाणी येऊन गेले तेव्हा ते ओबीसींबाबत बोलले. मात्र माझा त्यांना सवाल आहे. साठ वर्षात तुमची सत्ता होती तुम्ही ओबीसींसाठी काय केलं? ते सांगा. तर गेल्या दहा वर्षात आम्ही ओबीसींसाठी काय केलं ते आम्ही लगेच सांगू शकतो. त्यामुळेच आम्हाला ओबीसींचा पाठिंबा मिळतोय. पंतप्रधान मोदींचं मंत्रिमंडळ स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्री असणारे मंत्रिमंडळ आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube