मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा राज्यभर परिणाम; शरद पवारांचा मोठा दावा

  • Written By: Published:
मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा राज्यभर परिणाम; शरद पवारांचा मोठा दावा

Vijaysinh Mohite–Patil ncp entry will have state-wide effect-Sharad Pawar :माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) कुटुंब पुन्हा एकदा शरद पवारांबरोबर आले आहे. विजयसिंह मोहिते यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हे आता माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. तर मोहिते कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माढा, सोलापूर, बारामती या तीन मतदारसंघाचे राजकीय चित्र पलटणार आहे. त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत एक मोठे विधान केले आहे. मोहित पाटील हे महाविकास आघाडीत आल्यानंतर याचा राज्यभरात संदेश जाईल. राज्यभर परिणाम होईल. त्यातून महाविकास आघाडीच्या जागा वाढतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील व इतर नेते आज अकलूजमध्ये होते. त्यांनी विजयसिंह मोहिते यांची भेट घेतली. त्यानंतर मोहिते कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच धैर्यशील मोहिते यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. यावर शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते हे निवडणूक लढविणार आहेत. ते 16 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच माढा, सोलापूरमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला आहे.

Devendra Fadanvis चांगले गृहमंत्री, त्यांचं मराठ्यांवर जास्तच प्रेम; जरांगेंचा फडणवीसांना टोला

सोलापूर जिल्हा पुरोगामी विचाराचा आहे. गांधी व नेहरु यांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा आहे. त्यामुळे सोलापूरमधून प्रणित शिंदे आणि माढातून धैर्यशील मोहिते हे मोठ्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मोहिते कुटुंब आमच्याबरोबर आल्याने माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघावर परिणाम होईलच. तसेच या निर्णयाचा संदेश या तीन मतदारसंघात सीमित राहणार नाही. हा राज्यात संदेश जाईल. त्याचा राज्यभर परिणाम होईल.

महाविकास आघाडीच्या जागा अनेक पटीने वाढतील

मागील लोकसभेला चार जागा राष्ट्रवादीला एक जागा काँग्रेसला मिळाली होती. तर एक जागा एमआयएमला मिळाली होती. आता चित्र हे वेगळे राहिल. महाविकास आघाडीच्या जागा किती तरी पटीने वाढेल, असा दावा शरद पवारांनी केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube