Rahul Gandhi हे तर रचना रानडे यांना मागे टाकू शकतात…

  • Written By: Published:
Rahul Gandhi हे तर रचना रानडे यांना मागे टाकू शकतात…

(Rahul Gandhi`s investment in share market) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिले आहे. राहुल गांधी यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या शेअर्सची तसेच एकूण संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांच्याविषयी तुमचे मत काही असले तरी ते अव्वल गुंतवणूकदार आहेत. त्यातही त्यांनी शेअऱ बाजारात चांगली गुंतवणूक केली आहे. त्यांनी २५ कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. १५ मार्च २०२४ रोजीच्या बंद भावानुसार या गुंतवणुकीच एकूण मूल्य  4.3 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या २५ कंपन्यांपैकी फक्त चार कंपन्यांनी निगेटिव्ह रिटर्न्स म्हणजे उणे परतावा दिला आहे. राहुल गांधी यांच्या कंपन्यांना फाॅलो केले असते तर गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळाले असते. प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार रचना रानडे यांच्यापेक्षा सरस सल्ला हे राहुल गांधी कन्सल्टंट म्हणून देऊ शकले असते, अशी कामगिरी राहुल यांच्या पोर्टफोलिओने केली आहे.

बडे गुंतवणूकदार बसंत माहेश्वरी यांनी राहुल गांधी यांच्या या गुंतवणुकीचे वर्णन अजय अमर पोर्टफोलिओ असे केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बहुतांश लार्ज कॅप कंपन्या त्यांनी घेतल्या आहेत. या प्रचंड म्हणावा असा परतावा देऊ शकत नाहीत. पण त्यातील गुंतवणूक सुरक्षित राहणारी आहे.

राहुल यांच्याकडे कंपन्यांची संख्याही जास्त आहे. चांगला गुंतवणूकदार हा एका वेळी कमाल ८ त १० कंपन्यांत गुंतवणूक करतो. त्या अर्थाने राहुल यांच्या पोर्टफोलिओमधून श्रीमंत होता येणार नाही पण गुंतवणूक सुरक्षित राहण्याची हमी मिळू शकते, असे माहेश्वरी यांचे म्हणणे आहे.

राहुल यांनी आपल्या गुंतवणुकीमध्ये चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतल्याचे दिसून येत आहे. बाजारात लार्ज कॅप म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा बहुतांश कंपन्या त्यांच्याकडे आहेत. यातील बहुतांश कंपन्या या निफ्टी किंवा सेन्सेक्स या निर्देशांकात आहेत. राहुल यांनी या कंपन्यांमध्ये केव्हा गुंतवणूक केली आहे, याची माहिती या प्रतिज्ञापत्रातून मिळत नाही. मात्र त्यांच्या २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात कंपन्यांतील गुंतवणुकीची माहिती नाही. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांत त्यांनी केव्हातरी हे पैसे शेअर्समध्ये गुंतविले असल्याची शक्यता आहे.


दोन कंपन्यांचा वार्षिक परतावा २०० टक्क्यांहून अधिक

यातील प्रसिद्ध नसलेली कंपनी म्हणजे Vertoz Advertising Ltd  ही कंपनी. स्माॅल कॅपमध्ये राहुल गांधी यांच्याकडे हीच कंपनी आहे. या कंपनीचा गेल्या वर्षभरातील परतावा मात्र थक्क करणारा आहे. तब्बल २५० टक्के परतावा या कंपनीने वर्षभरात दिला आहे. या कंपनीचे बाजारमूल्य म्हणजे मार्केट कॅप फक्त १४०४ कोटी रुपये आहे. ५२ आठवड्यात कंपनीच्या भावाचा निचांक हा २५० रुपये तर उच्चांक ९०५ रुपये होता. ही कंपनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करते. २०१२ मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. राहुल यांनी कोणत्या भावाला या कंपनीचा शेअर खरेदी केला, याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून मिळत नाही. पण त्यांनी कमी भावात खरेदी केली असेल तर त्यांना चांगला परतावा मिळाला असण्याची शक्यता आहे. पण या कंपनीचे फारच कमी म्हणजे फक्त २६० शेअर्स त्यांच्याकडे आहेत. त्याची एकूण किंमत एक लाख ९० हजार रुपये आहे.

राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओतील दणदणीत नफा मिळवून देणारी दुसरी कंपनी म्हणजे गरवारे हायटेक लिमिटेड. या कंपनीने २३० टक्के परतावा गेल्या वर्षभरात दिला आहे. या कंपनीचा ५२ आठवड्यातील निचांकी भाव हा ५२८ रुपये तर उच्चांकी भाव २२०० रुपये राहिला आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे ५०८ शेअर आहेत. १५ मार्च रोजीच्या भावानुसार या शेअरची एकूण किंमत १६ लाख रुपये ४३ हजार रुपये आहे.

राहुल यांनी व्हेरटोझ आणि गरवारे हाय टेक या दोन कंपन्यांतच मोठी रक्कम गुंतवली असती तर ते जास्त मालामाल झाले असते. पण २५ कंपन्या निवडल्याने राहुल यांचा गुंतवणुकीवरील वार्षिक परतावा हा १४ ते १५ टक्के इतका मिळाला असण्याची शक्यता आहे.

आयटी कंपन्यांत चांगली गुंतवणूक

देशातील आयटी क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस, टीसीएस या कंपन्या राहुल यांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत.  इन्फोसिस कंपनीचे ८७० शेअर्स त्यांच्याकडे आहेत. त्याची किंमत १५ मार्चच्या भावानुसार १४ लाख २१ हजार रुपये आहे. इन्फोसिसची कामगिरी गेल्या वर्षभरात तशी निराशाजनक राहिली आहे. फक्त चार टक्के परतावा कंपनीने गुंतवणूकदारांना दिला आहे. पण सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकांनी पसंती इन्फोसिस राहिली आहे. टीसीएस कंपनीचे २३४ शेअर्स त्यांच्याकडे आहेत. तब्बल १५ लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या कंपनीने गेल्या वर्षभरात २२ टक्के परतावा दिला आहे. राहुल गांधी यांच्याकडील शेअरची किंमत ९ लाख ८७ हजार रुपये आहे

याशिवाय इन्फोएज, एलटीआय माइंड ट्री या आयटी कंपन्यांतही राहुल यांची गुंतवणूक आहे. सुमारे एक कोट ४० लाख बाजारमूल्य असलेल्य एलटीआयने फक्त ०.९६ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.  99acres.com, naukari.com अशा वेबसाईट चालविणा्या इन्फोएजमध्ये राहुल गांधी यांना चांगला फायदा झाला असण्याची शक्यता आहे. कारण या कंपनीने गेल्या वर्षभरात तब्बल ५० टक्के परतावा दिला आहे. या कंपनीचे ४५ शेअर त्यांच्याकडे आहेत. त्याची एकूण किंमत सुमारे ४. ५ लाख रुपये आहे. ही कंपनी राहुल यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाॅप परफाॅरमरपैकी एक आहे.

सिगारेट तसेच खाद्यपदार्थांमधील आघाडीची कंपनी असलेल्या आयटीसी मध्येही त्यांनी पैसे गुंतवले आहेत. कंपनीचे ३०९३ शेअर त्यांच्याकडे असून त्याचे किंमत १२ लाख ९६ हजार रुपये आहे. ITC चे बाजारमूल्य तब्बल १० लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात कंपनीने दहा टक्के परताव दिला आहे.

सर्वाधिक गुंतवणूक Pidilite Industries मध्ये

<राहुल यांची सर्वाधिक गुंतवणूक ही Pidilite Industries या कंपनीत आहे. तुम्हाला फेव्हिकाॅल माहीत आहे ना? त्याची निर्मिती ही कंपनी करते. पिरामल ग्रुपची ही कंपनी आहे. या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे दीड लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीने २९ टक्के परतावा दिला आहे.  राहुल यांच्याकडे या कंपनीचे 1474 शेअर्स आहेत. त्याची एकूण किंमत 42.27 लाख रुपये आहे. एकूणच या कंपनीतील गुंतवणूक राहुल यांच्यासाठी चांगली ठरली आहे.

फायनान्स क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून Bajaj Finance ची ओळख आहे. ग्राहक कर्जांमध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. या कंपनीचे एकूण बाजारमूल्य सुमारे साडेचार लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीने सुमारे २८ टक्के रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीत राहुल गांधी यांनी 35.89 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 551 शेअर्स आहेत.

मॅगी बनविणाऱ्या Nestle India ही कंपनी राहुल गांधी यांच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यांनी या कंपनीचे 1370 शेअर्स खरेदी केले आहेत. त्याची किंमत 35.67 लाख रुपये आहे. या कंपनीने गेल्या वर्षभरात सुमारे ३० टक्के परतावा दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजारमूल्य दोन कोटी ४६ लाख कोटी रुपये आहे. या कंपनीचे नाव घरोघरी माहिती आहे. या कंपनीची रंगाची उत्पादने सर्वांनी वापरलेली असतील. रंगाच्या क्षेत्रात टाॅपवर असलेल्या  Asian Paints चे गुंतवणुकीचे रंग गेले वर्षभर मात्र फिके पडले आहेत. या कंपनीने फक्त साडेतीन टक्के परतावा दिला वर्षभरात दिला आहे. या कंपनीचे राहुल गांधी यांच्याकडे 35.29 लाख किमतीचे 1231 शेअर्स आहेत. राहुल यांच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात कमी परतावा देणारी हीच कंपनी आहे.

Titan Company :
तर टाटा समूहाची लोकप्रिय कंपनी टायटनमध्ये राहुल गांधी यांनी 32.59 लाखांची गुंतणवूक केली आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 897 शेअर्स आहेत. ही कंपनी घड्याळे आणि ज्वेलरीमध्ये क्रमांक एकवर आहे. या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल साडे तीन लाख कोटी रुपयांचे आहे. कंपनीने गेल्या वर्षात ४७ टक्के परतावा दिला आहे. राहुल गांधी यांच्या पोर्टफोलिओतील या कंपनीची कामगिरी उत्तम राहिली आहे.

Tube Investments of India Ltd :
उत्पादन क्षेत्रातील मिड कॅप कंपनी असलेल्या टयूब इन्वेस्टमेंटने गेल्या वर्षभरात उत्तम म्हणजे तब्बल ४२ टक्के परतावा दिला आहे.  या कंपनीचे ३४० शेअर राहु गांधींकडे आहेत. त्याची किंमत सुमारे ४२ लाख रुपये आहे.


हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये तोटा

Hindustan Unilever : लक्स, लाईफबाॅय हे साबण, पाॅन्डस सौंधर्य प्रसाधाने तयार करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीतही  राहुल गांधी यांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे  1161 शेअर्स आहेत. त्यांची किंमत 27.02लाख रुपये आहे. या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ५.३२ लाख कोटी रुपये आहे. या कंपनीची गेल्या वर्षभरातील कामगिरी मात्र निराशजनक आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या वर्षभरात १२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

सुमारे ७.५ लाख कोटी इतके बाजारमूल्य असलेल्या ICICI Bank मध्ये देखील त्यांनी गुंतवणूक केली आहे. या बँकेचे 2299 शेअर्स त्यांच्याकडे आहे.  ज्याची सध्या किंमत 24.83 लाख रुपये आहे. बॅंकेच्या शेअरने गेल्या वर्षभरात 22 टक्के परतावा दिला आहे.

औषधनिर्मिती क्षेत्रातील Divi’s Laboratory चे 19.7 लाख किमतीचे 567 शेअर्स राहुल यांच्याकडे आहेत. या कंपनीचे बाजारमूल्य सुमारे एक लाख कोटी रुपये आहे. कंपनीने वर्षभरात ३० टक्के परतावा दिला.

Suprajit Engineering 
या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनीचे 4068 शेअर्स त्यांनी खरेदी केले आहेत. इतर कंपन्यांच्या मानाने ही छोटी कंपनी आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपये तिचे बाजारमूल्य आहे. राहुल गांधी यांच्याकडे असलेल्या शेअरची एकूण किंमत 16.65 लाख रुपये आहे. या कंपनीने वर्षभरात २० टक्के परतावा दिला आहे.

<

याशिवाय  बिस्किट बनविणाऱ्या ब्रिटानिया कंपनीचे फ्युचर काॅल ऑप्शनही राहुल गांधी यांनी घेतले आहेत. पण त्याची किंमत फक्त १५५० रुपये आहे. मोल्ड टेक पॅकेजिंग ही फारच छोटी कंपनी राहुल यांनी निवडली आहे. या कंपनीचे बाजारमूल्य फक्त दोन हजार ८०० कोटी रुपये आहे. या कंपनीने वर्षभरात दहा टक्के उणे परतावा दिला आहे. या कंपनीचे १९५३ शेअऱ त्यांनी घेतले आहेत. त्याची किंमत १४ लाख ५ हजार रुपये आहे. अल्काईल अमाईन्स, दीपक नायट्रेट अशा रासायनिक क्षेत्रातील कंपन्याही त्यांच्याकडे आहेत. या कंपन्यांचा परतावा दहा ते वीस टक्के आहे. GMM Pfaudler या स्माॅल कॅप कंपनीचे १४४१ शेअर त्यांनी खरेदी केले आहेत. या कंपनीचा गेल्या वर्षभरातील परतावा उणे दहा टक्के आहे. राहुल गांधी यांना निगेटिव्ह रिटर्न्स देणारी दुसरी कंपनी म्हणजे फाईन ऑरगॅनिक. या कंपनीने दोन टक्के उणे परतावा दिला आहे.  या कंपनीचे २११ शेअर्स त्यांच्याकडे आहेत. त्याची एकूण किंमत ८ लाख ५६ हजार रुपये आहे.

एकाही सरकारी कंपनीचे शेअर्स नाहीत.

मोदी सरकारकडून दहा वर्षांच्या कालावधीत सरकारी कंपन्यावर जास्त भर देण्यात आला. मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे, पोर्ट, संरक्षण आदी क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या ऑर्डर मिळाल्या. त्यामुळे या कंपन्यांनी काही पट परतावा दिला. मात्र राहुल गांधी यांच्याकडे एकाही सरकारी कंपनीचे शेअर्स नसावेत हे विशेष म्हणायला हवे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube