Iran vs Israel Military Power: इराण – इस्रायलमध्ये युद्ध पेटलं तर कोणाकडे किती लष्करी ‘पावर’ ?

Iran vs Israel Military Power: इराण – इस्रायलमध्ये युद्ध पेटलं तर कोणाकडे किती लष्करी ‘पावर’ ?

Iran vs Israel Military Power: 1 एप्रिलला इस्रायलने (Israel) ड्रोन हल्ला केल्यानंतर आता इराणकडून (Iran) देखील इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून याला दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हटले आहे. तर दुसरीकडे आता इस्रायल देखील या हल्ल्यावर इराणला प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि हमास युद्धानंतर (Hamas and Israel War) इस्रायल आणि इराण युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध झाला तर कोणता देश विजय मिळवेल? कोणत्या देशाकडे जास्त लष्करी पावर (Military Power) आहे? या प्रश्नांचा उत्तर जाणून घ्या.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल संरक्षण बजेटच्या बाबतीत इराणच्या पुढे आहे तर सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत इराण इस्रायलपेक्षा खूप पुढे आहे. द सनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचे संरक्षण बजेट 24.2 अब्ज डॉलर आहे तर इराणचे संरक्षण बजेट 9.9 अब्ज डॉलर आहे. या अहवालानुसार, इस्रायलकडे 612 तर इराणकडे 551 विमाने आहेत. मात्र रणगाड्यांचा विचार करता इराणची ताकद इस्रायलच्या जवळपास दुप्पट आहे. इस्रायलकडे 2200 तर इराणकडे 4071 रणगाडे आहेत.

समुद्रात शक्तिशाली कोण आहे?

अहवालानुसार, इराणकडे 101 युद्धनौका आहे तर इस्रायलकडे 67 युद्धनौका आहेत. तर इस्रायलकडे 43 हजार चिलखती वाहने आहेत, तर इराणकडे 65 हजार चिलखती वाहने आहेत. सैनिकांच्या संख्येच्या बाबतीतही इराण इस्रायलपेक्षा पुढे आहे. सध्या इराणकडे 5.75 लाख सैनिक आहे तर इस्रायलकडे 1.73 लाख सैनिक आहेत. याशिवाय इराणकडे 3.50 लाख राखीव सैनिक आहेत आणि इस्रायलकडे 4.65 लाख राखीव सैनिक आहेत.

इस्रायलकडे 80 अणुबॉम्ब

तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार , इस्रायलकडे तब्बल 80 अणुबॉम्ब आहे तर इराणकडे अधिकृतपणे एकही अणुबॉम्ब नाही. यामुळे इराणपेक्षा इस्रायल जास्त ताकदवान आहे मात्र अमेरिकन मीडियानुसार, इराणने देखील मोठ्या प्रमाणावर युरेनियम स्टोर केला आहे. या युरेनियमचा वापर इराण अणुबॉम्ब तयार करण्यासाठी करत असल्याची माहिती अमेरिकन मीडियाने दिली आहे. याच बरोबर इराण आता त्यांच्याकडे असणारे शस्त्रेही अपग्रेड करत आहेत.

इराणने गेल्या काही वर्षांपासून ड्रोन आणि सायबर क्षमतांचा विस्तार करण्यावर खूप लक्ष दिले आहे. तर इस्रायलकडे अत्याधुनिक लढाऊ विमाने, आयर्न डोमसारखी आधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे. यामुळे जर या दोन्ही देशात युद्ध झाला तर याचा फटका दोन्ही देशांसह संपूर्ण जगाला बसल्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube