Israel Hamas War : युद्धविरामानंतर इस्त्रायलचा हमासवर एअरस्ट्राईक; तब्बल 90 लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : युद्धविरामानंतर इस्त्रायलचा हमासवर एअरस्ट्राईक; तब्बल 90 लोकांचा मृत्यू

Israel Hamas War : मागील वर्षातील 7 ऑक्टोबरपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. साडेतीन महिने उलटले तरीही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. हमास या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण बिमोड करण्याच्या इराद्याने इस्त्रायलने कारवाई (Israel Attack) सुरूच ठेवली आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापूर्वी युद्धविराम घोषित करण्यात आला होता. मात्र, सहा दिवसांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलने तुफान हल्ले केले. या हल्ल्यात गाझातील (Gaza City) तब्बल 90 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Israel Hamas War : हमासचा पलटवार! गाझात अंदाधुंद गोळीबार, 9 इस्त्रायली सैनिकांचा मृत्यू

या हल्ल्यात अनेक इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. अचानक बॉम्बफेक सुरू झाल्याने पॅलेस्टाईनमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर या भागातील इंटरनेट आणि संपर्क सेवा बंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकणी निघून जाण्यास प्राधान्य दिले आहे. या हल्ल्यानंतर गाझा आरोग्य मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. या युद्धात आतापर्यंत 23 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. युद्धात मोठं नुकसान झालं आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. या युद्धाचे चटके जगालाही बसू लागले होते. त्यामुळे अन्य देशांच्या मध्यस्थीनंतर 24 नोव्हेंबरपासून सात दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी हमासने इस्त्रायलच्या 16 ओलिसांची सुटका केली होती. मात्र हमासने अद्याप सगळ्या बंधकांची सुटका केलेली नाही असा आरोप इस्त्रायलने केला होता. तसेच गाझा पट्टीत कुणीही निर्दोष नाही असे इस्त्रायलने ठासून सांगितले होते. यानंतर आणखी काही वेळा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती.  मात्र युद्धविराम संपताच बॉम्बफेक सुरू होत होती. आताही इस्त्रायलने पुन्हा हमासवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.

आतापर्यंत या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा,  कॉलेज, निवासी इमारती, रुग्णालयांचे प्रचंड नुकासान झाले आहे. तसेच दोन्ही बाजूच्या हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. आताही येथील परिस्थितीच चिघळलेलीच आहे. युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मात्र अद्याप यश मिळालेले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज