मोठी बातमी! इस्त्रायलचं अखेर ठरलं, गाझा घेणार ताब्यात; नेतान्याहूंचा प्लॅन सुरक्षा परिषदेकडून मंजूर

Israel News : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोठा प्लॅन (Israel News) आखला आहे. याआधी पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले होते की इस्त्रायल गाझावर कब्जा करणार नाही. याऐवजी अंतरिम सरकारकडे गाझाचा ताबा देऊ. परंतु, आता नवी माहिती हाती आल्याने खळबळ उडाली आहे. इस्त्रायल खरंच गाझाचा ताबा घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार इस्त्रायली सुरक्षा परिषदेने नेतान्याहू यांच्या प्लॅनला मंजुरी दिली आहे.
इस्त्रायल आणि गाझात मागील अनेक दिवसांपासून तणाव आहे. मागील 22 महिन्यांपासून सुरू असेललं युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. नेतान्याहू यांनी गुरुवारी सांगितले की हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी गाझा पट्टी पूर्णपणे कब्जा करणे गरजेचे आहे. एका न्यूज चॅनेलला नेतान्याहू यांनी मुलाखत दिली. इस्त्रायल पूर्ण तटीय क्षेत्रावर ताबा घेणार का असा प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर नेतान्याहू म्हणाले, आम्ही या क्षेत्राला आमच्याकडे ठेऊ इच्छित नाही. आम्ही सुरक्षा घेरा तयार करू इच्छितो. या ठिकाणी शासन करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.
Israel Iran War दरम्यान चीन अन् रशियाची भूमिका ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी?
इस्त्रायलच्या सुरक्षा परिषदेने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. इस्त्रायल गाझा शहराला (Gaza City) अरब फोर्सेसना सोपवू इच्छितो. त्यांच्याकडूनच या भागात राज्य कारभार चालवावा असे नेतान्याहू यांनी सांगितले. मात्र गाझा कोणत्या अरब देशाला देणार याची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे आगामी काळात इस्त्रायल काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता
रिपोर्टनुसार सुरक्षा परिषदेला कोणत्याही प्रस्तावासाठी आधी संपू्र्ण मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. रविवारपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाझात ज्या ठिकाणी सैन्य तैनात नाही त्या भागावर कब्जा केला जाऊ शकतो. या भागातील पॅलेस्टिनी नागरिकांना येथून निघून जाण्याचा इशारा दिला जाऊ शकतो.
Video : “माझं शरीर कमकुवत होतंय आता मी..” हमासच्या भुयारातील इस्त्रायली कैद्याचे अखेरचे शब्द