Israel Iran War दरम्यान चीन अन् रशियाची भूमिका ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी?

role of China and Russia in the Israel-Iran War be the beginning of World War III : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला (Israel Iran War) आहे. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा (Israel Attack) हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं. तुफान बॉम्बफेक करण्यात आली. या हल्ल्यांत संपूर्ण तेहरान हादरून गेले. या हल्ल्याला इराणने देखील उत्तर दिले. त्यामुळे जगामध्ये तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दरम्यान आता इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये चीन आणि रशिया या दोन साम्यवादी राष्ट्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याचं कारण काय? जाणून घेऊ…
चीन अन् रशियाची भूमिका ठरणार तिसऱ्या महायुद्धाची नांदी?
इस्त्रायल आणि इराण (Israel Iran War) यांच्यातील संघर्षानंतर आता जगामध्ये तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. या संघर्षामध्ये चीन आणि रशिया या दोन साम्यवादीराष्ट्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर आता पर्यंत या युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. तर चीन आणि रशियाने ईराणच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रने देखील या पार्श्वभूमीवर संकटकालीन बैठक बोलावली आहे.
‘त्या’ शब्दावरून जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, मंत्री शिरसाटांवर केले गंभीर आरोप
या दरम्यान तिसऱ्या महायुद्धाबद्दल बोलायचं झालं तर महायुद्ध हे तेव्हाच होतं जेव्हा जगातील अनेक देश सोबत युद्धात उतरतात. सध्या मात्र इस्त्रायल आणि इराण (Israel Iran War) यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र हे हल्ले प्रतिहल्ले सुरूच राहिले तर ते जगभर पसरतील. त्यात अमेरिका हे इस्त्रायलचा प्रमुख मित्र आहे. त्यांचे मध्य पुर्वेत त्यांचे 40 हजार सैन्य आहे. जर इराणवर आणखी हल्ले झाले तर अमेरिका देखील यात उतरेल. दुसरीकडे चीन आणि रशिया हे दोन साम्यवादी राष्ट्र इराणचे मित्र आहेत. ते इराणला मदत करतील तर हे युद्ध मोठ्या स्तरावर जाऊ शकतं. तज्ज्ञांचम म्हणणं आहे की, जर 72 तास ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर महायुद्धाची शक्यता 30-40 टक्क्यांनी वाढेल.
Received a phone call from PM @netanyahu of Israel. He briefed me on the evolving situation. I shared India's concerns and emphasized the need for early restoration of peace and stability in the region.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2025
रशियाची भूमिका काय?
या संघर्षामध्ये रशियाचा इराणला (Israel Iran War) मजबूत पाठिंबा आहे. या संघर्षादरम्यान 13 जून 2025 ला इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. त्याचा रशियाने निषेध केला. ते म्हणाले की, हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन आहे. यामुळे युद्ध होऊ शकतं. तर रशियाने इराणला एस -300 वायु सुरक्षा प्रणाली दिलेली आहे. युक्रेन युद्धात त्यांनी शाहेद-136 ड्रोनचा वापर केला होता. त्यामुळे रशयाने जर इराणला आणखी शस्त्र पुरवठा करेल तर हा संघर्श आणखी वाढेल. कारण रशियाला मध्य पुर्वेमध्ये अमेरिकेच्या प्रभाव कमी करायचा आहे. इराणचं समर्थन केल्याने त्यांना ही संधी मिळत आहे.
चीनची भूमिका काय?
या संघर्षामध्ये चीनचा इराणला (Israel Iran War) मजबूत पाठिंबा आहे. कारण त्यातील अर्थकारण आणि कुटनिती दबाव. चीनने इराणशी 400 अरब डॉलरचा करार केला आहे. त्यामुळे यावर परिणाम होऊ नये म्हणून इस्त्रायल विरूद्ध इराणला पाठिंबा देत चीनने इस्त्रायलच्या हल्ल्याला अस्थिरता पसरवणारा हल्ला म्हणत विरोध केला आहे. मात्र चीनने अद्याप या संघर्षामध्ये सैन्याची मदत केलेली नसली तरी ते इराणला अर्थिक सहाय्य देणार आहेत. ज्यामुळे हे युद्ध वाढू शकते. दुसरीकडे चीनला मध्य पुर्वेतून तेल आणि गॅस मिळतो. त्याची सुरक्षा करणं चीनला गरजेचे आहे. त्यामुळे अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिला तर चीन इराणच्या पाठिमागे उभा राहिलं.
शिरसाटांना नोटीस पाठवा, वकिलांना पेमेंट मी करतो; गंभीर आरोप करत जलील यांनी दंड थोपटले
दुसरीकडे अरब देशातील जॉर्डनने इराणवर (Israel Iran War) आलेल्या ड्रोनला रोखण्यास मदद केली. मात्र सौदी अरब आणि यूएई तटस्थ आहेत. तुर्कीने मध्यस्थि केली. मात्र इस्त्रायलशी त्यांचे संबंध तणावपूर्ण आहेत. भारताने शांततेसाठी अपिल केलं. भारतीय नागरिकांना मध्य पूर्वेतून लौटने परतण्याचा सल्ला दिला. तर आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी संयुक्त राष्ट्र आणि यूरोपीय संघ शांततेसाठी दबाव आणत आहेत. कारण या युद्धामुळे तेलाच्या किंमती प्रतिबॅलर 100 डॉलरहून अघिक होतील. ज्यामुळे जागाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जगाला इराणकडील अणुबॉम्बचा धोका देखील आहे.