गाझात अल-जझीराचे 5 पत्रकार ठार! इस्रायलचा हल्ला, ‘हामासचे दहशतवादी’ म्हणून टार्गेट

गाझात अल-जझीराचे 5 पत्रकार ठार! इस्रायलचा हल्ला, ‘हामासचे दहशतवादी’ म्हणून टार्गेट

Journalist Killed In Gaza Hamas Israel War : इस्रायल आणि हमासमधील (Hamas Israel War) तणाव शिगेला पोहोचला आहे. 22 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अनस अल-शरीफ यांच्या हत्येमुळे (Anas Al Sharif) पत्रकारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न (Journalist) उपस्थित झाले आहेत.

पत्रकारांचा आवाज दाबण्याचे षड्यंत्र

इस्रायली सैन्याने गाझा शहरात हवाई हल्ल्यात अल जझीराचे पत्रकार अनस अल-शरीफ यांची हत्या केली. इस्रायली सैन्य हा पत्रकार हमासचा एक प्रमुख नेता असल्याचं सांगत आहे. अल जझीराने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्याचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला झाला, तेव्हा अनस अल-शरीफ त्यांच्या चार सहकारी पत्रकारांसह आणि एका सहाय्यकासह गाझा शहराच्या पूर्वेकडील शिफा रुग्णालयाजवळील एका तंबूत होते.

जगदीप धनखड सरकारच्या नजरकैदेत? संजय राऊतांचं थेट अमित शाहांना पत्र

सैनिकांवर हल्ल्यांची योजना

गाझा अधिकाऱ्यांनी आणि अल जझीराने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्याने असा दावा केला आहे की, अनास अल-शरीफ हा हमासचा एक महत्त्वाचा कमांडर होता. तो इस्रायली नागरिक आणि सैनिकांवर रॉकेट हल्ल्यांची योजना आखत असे. हे सिद्ध करण्यासाठी गाझामध्ये त्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणा आणि कागदपत्रे सापडल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. परंतु अल जझीरा आणि पॅलेस्टिनी पत्रकार संघटनांनी हा दावा फेटाळून लावला आणि तो निराधार असल्याचे म्हटले.

गाझाचा सर्वात तरुण पत्रकार

मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी, अनस अल-शरीफ यांनी X वर पोस्ट केले होते की, इस्रायल दोन तासांहून अधिक काळ गाझा शहरावर बॉम्बस्फोट करत आहे. अनस अल-शरीफ यांच्यासोबत मारले गेलेले इतर पत्रकार म्हणजे मोहम्मद करैका, इब्राहिम झहेर आणि मोहम्मद नौफल. अल जझीराने अनस यांना ‘गाझाचा सर्वात तरुण पत्रकार’ असे वर्णन केलंय. म्हटलंय की, हा हल्ला गाझामधील सत्य दाखवणाऱ्या आवाजांना शांत करण्याचा प्रयत्न आहे.हमासने म्हटलंय की, ही हत्या गाझावरील मोठ्या इस्रायली हल्ल्याची सुरुवात असू शकते.

‘अरण्य’ मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी; लक्षवेधक मोशन पोस्टर प्रदर्शित

पत्रकारांची हत्या आणि वाचलेल्यांना धमकावणे हे गाझामध्ये मोठ्या इस्रायली गुन्ह्याचा मार्ग मोकळा करत आहे, असं हमासने एका निवेदनात म्हटलंय. अनस अल शरीफ यांच्या एक्स अकाउंटवर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञ आयरीन खान यांनी गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, त्यांच्या रिपोर्टिंगमुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. जुलैमध्ये, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी काम करणारी संघटना कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सने आंतरराष्ट्रीय समुदायाला अनासचे संरक्षण करण्याचे आवाहन केले होते. परंतु या हल्ल्याने सर्व इशारे धुडकावून लावले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube