खराडी रेव्ह पार्टीत मोठा ट्विस्ट! आरोपींच्या घरात ड्रग्ज नाहीच, झडतीत फक्त डिजिटल पुरावे जप्त

Police Raid On Kharadi Rave Party Accused Home : पुण्यातील खराडी येथील चर्चित रेव्ह पार्टी (Kharadi Rave Party) प्रकरणात मोठा अपडेट समोर आलंय. या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरसह अन्य सहा जणांच्या घरांवर पुणे पोलिसांनी झडती (Police Raid) घेतली आहे. यावेळी पोलिसांना कोणतेही अमली पदार्थ सापडले नाहीत. मात्र, तपासाच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आरोपींच्या घरांमधून (Pune News) मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स आणि मेमरी कार्ड्स जप्त केली आहेत.
तपासात उघड झाल्याप्रमाणे, या पार्टीसाठी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून नियोजन झालं होतं. पार्टीपूर्वी आरोपींनी एकमेकांशी सोशल मीडियाच्या चॅट्सद्वारे संवाद साधला होता. खराडीतील ‘बर्ड स्टे सूट’ येथे 25 ते 28 जुलैदरम्यान ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सात आरोपींपैकी दोन जण प्रत्यक्ष उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
महादेवाच्या कृपेने नशीब बदलणार! आज नागपंचमीच्या दिवशी ‘या’ राशी ठरणार भाग्यशाली
पोलिस कोठडी संपली, आरोपी पुन्हा न्यायालयात
या प्रकरणातील आरोपींना दिली गेलेली पोलिस कोठडी आज (29 जुलै) संपत असून, त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून पुन्हा कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे, तर आरोपींच्या बाजूने वकील जामिनासाठी किंवा न्यायालयीन कोठडीसाठी युक्तिवाद करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुसळधार पावसाचा कहर! मृतांचा आकडा 30 पार, 80 हजाराहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
जावयासाठी एकनाथ खडसे मैदानात
या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असल्याने खडसे यांनाही यामध्ये अप्रत्यक्षपणे ओढले गेले आहे. खडसे कालपासून पुण्यात असून त्यांनी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजता एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार आहेत. या प्रकरणावर ते काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डिजिटल पुराव्यांवर लक्ष
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड्सवरून सोशल मीडियावरील संवाद तपासण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच पार्टीचे आयोजन कसे झाले, कोणकोण सहभागी होते आणि बाहेर कोणते नेटवर्क कार्यरत होते, याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ड्रग्ज सापडले नसले तरी डिजिटल पुराव्यांमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.