NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम पण चिन्ह कधी मिळणार? SC चा निर्णय

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम पण चिन्ह कधी मिळणार? SC चा निर्णय

NCP Crisis : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. या युक्तिवादानंतर शरद पवार गटाचं नाव कायम आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडून अर्ज करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिले आहेत.

महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हाण देणारी हीच का भाजपची संस्कृती?, वडेट्टावारांचा थेट सवाल

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष बहाल करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार गटाने पक्ष आणि चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाला देण्यात आलेल्या नावाला अजित पवार गटाकडून विरोध करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव आमच्या पक्षाशी समसमान असल्याचं म्हणत अजित पवार गटाकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

Ritesh Deshmukh : “काका नेहमीच पाठिशी उभे राहिले, काका-पुतण्याचं नातं”… रितेशचं वक्तव्य चर्चेत

अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारल्याचं दिसून आलं आहे. मतदार राजा हा हुशार असून त्याला आपण कोणाला मतदान करतो हे चांगलं समजतं आहे. कारण याआधी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या नावाला विरोध करण्यात काही अर्थच नसल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. त्यानंतर आता तीन आठवड्यानंतर सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगींच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले, मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या आदेशात काय लिहिलंय. दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरलं नाही. आयोगाचा निष्कर्ष काय आहे की तुम्ही दोघांनी घटना पाळली नाही. फूट वगळून विलीनीकरणाची तरतूद करण्यात आली, त्याचा उद्देश काय होता, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याविरोधात शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube