राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! आता शरद पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?
Maharashtra Politics : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील पक्षांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षांतर केलं. अशातच आता भाजपने (BJP) राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली.
‘अर्बन’ बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईचा बडगा! 58 आरोपींच्या मालमत्तेचा होणार लिलाव
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 42 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असतील तर या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांच्या महत्त्वाच्या आणि बड्या नेत्यांना सोबत यावे लागेल, अशी भाजपची भूमिका आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर आता राष्ट्रवादीच्या (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्यासाठी भाजनने हालचाली सुरू केल्यात आहेत. त्या नेत्याचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. गेल्या काही वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठे आव्हान देत भाजपने आपले स्थान निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अद्याप आपला पाय रोवता आलेला नाही. त्यामुळे भाजपने या भागातील नेत्यांना आपल्या बाजूने घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांना पाठिंबा देणारा हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. इतकचं नाही तर या नेत्याला मत्रिमंडळात महत्त्वाचं खातंबही मिळणार, अशा बातम्या मध्यंतरी प्रकाशित झाल्या होत्या. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना या नेत्याने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, हा बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यचां सुत्रांनी सांगितलं.
दरम्यान, या नेत्याने राज्यातील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याशी आणि दिल्लीतील एका नेत्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची किंवा त्या नेत्यालाच लोकसभेत उतरवायचे, या पर्यायावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
‘तो’ नेता कोण?
राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते आणि शरद पवारांचे खास म्हणून या नेत्याचे महत्व पक्षात कायम राहिले आहे. शरद पवार यांच्या गटातील हा नेता भाजपसोबत आल्यास सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकेल, असे भाजपचे समीकरण आहे. राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेला या नेत्याचं सहकार क्षेत्रातही मोठे नाव आहे. त्यामुळं भाजपसोबत जाणार तो नेता कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.