‘आंदोलन केवळ राजकीय आरक्षणासाठी…’ चंद्रकांत पाटलांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

‘आंदोलन केवळ राजकीय आरक्षणासाठी…’ चंद्रकांत पाटलांची मनोज जरांगेंवर खोचक टीका

Chandrakant Patil Criticized Manoj Jarange Patil Protest : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं सुरू असलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आता अधिक तीव्र झालंय. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) थेट टीका केली आहे. त्यांच्या मते, जरांगे पाटील हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीच करत आहेत. या वक्तव्यामुळे मराठा समाजामध्ये संताप उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंदोलनाचा तिसरा दिवस

आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. घोषणाबाजी, तळमळ आणि आक्रमकता यामुळे आझाद मैदान परिसर तणावपूर्ण वातावरणात आहे.

मराठा समाजाची फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड सुरू आहे. मराठा समाजाला गावचे सरपंच पद घ्यायचं आहे. मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला जातीलही, पण तिथे मागण्या मान्य होणार नसतील, तर अपमान करून घ्यायचा कशाला? – चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कलाविश्वात शोककळा

राजकीय आरक्षणासाठी धडपड

मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड सुरू आहे. मराठा समाजाला गावचे सरपंच पद घ्यायचं आहे. मुख्यमंत्री जरांगे यांना भेटायला जातील ही, मात्र जाऊन मागण्या मान्य होणार नसतील. तर अपमान कशाला करून घ्यायचा, असा सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळालं होतं. पण जरांगे पाटील यांनी ते नाकारलं. त्यांची मागणी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षण मिळवण्यापुरतीच आहे.

कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कलाविश्वात शोककळा

58 लाख कुणबी नोंदी

त्यांनी पुढे सांगितलं की, सरकारने मराठा समाजातील जवळपास 58 लाख कुणबी नोंदी शोधून काढल्या आणि त्यावर आधारित कुणबी प्रमाणपत्रांचं वितरणही सुरू केलं आहे. सर्व प्रश्‍न सोडवले असतानाही जरांगे फक्त राजकीय आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरवत आहेत. मुंबईकरांना वेठीस धरणं योग्य नाही, असं आव्हानही त्यांनी दिलं.

दरम्यान, जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेले आंदोलनकरी दिवस काढत आहेत. कुणी ट्रेनने, कुणी खासगी वाहनांनी तर कुणी बसने मुंबई गाठत असल्याने सीएसएमटी स्थानक आणि आझाद मैदान परिसर गर्दीने फुलून गेलं आहे. घोषणाबाजीमुळे संपूर्ण वातावरण आंदोलनमय झालं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube