मुंबईत आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी BMC सज्ज! पाणी-शौचालयाची व्यवस्था, स्वच्छतेसाठी 8 हजार कर्मचारी

BMC Provided Facilities For Maratha Protest : आझाद मैदानावर (Maratha Protest) सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) पाणी, शौचालये आणि आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आंदोलकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय (Manoj Jarange Patil) होऊ नये, यासाठी पालिकेने विशेष पावले उचलली आहेत.
पाणी टँकर्स
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पालिकेने एकूण 25 टँकर उपलब्ध करून दिले आहेत. हे टँकर आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत तसेच येलो गेट, शिवडी फ्री वे, कॉटन ग्रीन वाहनतळ आणि वाशी जकात नाका येथे पाणीपुरवठा करीत आहेत.
कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कलाविश्वात शोककळा
स्वच्छता
आझाद मैदान आणि परिसरात सुमारे 8000 स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले असून ते सातत्याने स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत आहेत. आंदोलकांना कचरा संकलनासाठी पालिकेकडून मोठ्या संख्येने थैल्या (डस्टबिन बॅग) देण्यात आल्या आहेत. या थैल्यांमध्ये जमा झालेला कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपविण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.
भारतावर नवीन संकट! तेल-गॅस पुरवठा बंद होणार? ट्रम्प यांचे युरोपियन देशांना आदेश…
प्रसाधनगृह
आंदोलकांसाठी आझाद मैदान आणि परिसरात नियमित तसेच फिरते मिळून 300 पेक्षा अधिक शौचकूप असणारी प्रसाधनगृहांची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली आहे. या प्रसाधनगृहांची स्वच्छता नियमितपणे राखली जात आहे.