Chandrakant Patil : विद्यार्थ्यांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

Chandrakant Patil : विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे पदविका (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा राज्यात प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर त्यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 16, 2025
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक्सवर लिहिले की, प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आजपर्यंत 1 लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली आहे तर त्यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता, तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अर्ज सादर करण्यासाठी, सुधारित अंतिम तारीख 26 जून 2025 निर्धारित करण्यात आली आहे.
भारतीय संघाला धक्का, इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी
अर्ज सादर करण्याचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील जाणून घेण्यासाठी तसेच अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी आणि सुधारित अंतिम तारखेचा लाभ घ्यावा.