MNS candidates list : मनसेची चौथी यादी जाहीर, धंगेकरांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात…

  • Written By: Published:
MNS candidates list : मनसेची चौथी यादी जाहीर, धंगेकरांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात…

MNS 4th candidates list : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून आता मनसेनं (MNS) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, बीड, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यातील मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत कसबा पेठ (Kasbah Peth) मतदारसंघातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विरोधात गणेश भोकरे (Ganesh Bhokare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संदीप कोतकरांना मोठा धक्का, जिल्हाबंदी हटवण्याचा अर्ज फेटाळला… 

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभेला महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर आता राज ठाकरेंनी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर त्यांनी अनेक मतदारसंघात उमेदवार दिली. आज चौथ्या यादीत मनसेनं गणेश भोकरे यांना पुण्यातील कसबा पेठ या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Jharkhand Assembly Election 2024 : भाजपची यादी जाहीर, निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ फिक्स 

2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. कसब्यात काँग्रेसने धंगेकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता या जागेवर मनसेनं भोकरे यांना उमेदवारी दिली.

तर चिखली मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्या विरोधात गणेश बरबडे यांना उमेदवारी दिली.

मनसेची चौथी यादी….
1. कसबा पेठ – गणेश भोकरे
2. चिखली – गणेश बरबडे
3 कोल्हापूर उत्तर – अभिजीत राऊत
4. केज – रमेश गालफाडे
5. कलिना – संदीप उर्फ ​​बाळकृष्ण हुटगी

दरम्यान, मनसेनं दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली होती. तिसऱ्या यादीत मनसेने 13 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीतमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात अभिजित देशमुख लढवणार आहेत. त्यानंतर आज चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तर राज ठाकरे यांनी दुसऱ्या यादीत सर्वाधिक 45 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube