संदीप कोतकरांना मोठा धक्का, जिल्हाबंदी हटवण्याचा अर्ज फेटाळला…
Sandeep Kotkar : केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपींमध्ये समावेश असलेल्या माजी महापौर संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांची जिल्हाबंदी हटवण्याची (District ban) याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (ता. २५) फेटाळून लावली. त्यामुळे संदीप कोतकर यांची अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हाबंदी कायम राहणार आहे.
Jharkhand Assembly Election 2024 : भाजपची यादी जाहीर, निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ फिक्स
संदीप कोतकर हे लांडे खून प्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना उच्च न्यायालयाने लांडे खून प्रकरणातील जिल्हाबंदी शिथील केली होती. मात्र, केडगाव दुहेरी हत्याकांडातील जिल्हाबंदी कायम होती. या संदर्भात त्यांनी काल (ता. २४) नगर शहरात येऊन जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हाबंदी शिथील करण्याचा अर्ज दाखल केला होता. तत्पूर्वी न्यायालयात जाताना त्यांच्या समर्थकांनी शहरातून मिरवणूक काढली होती. या संदर्भात दोन गुन्हे त्यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. आज न्यायालयाने त्यांचा जिल्हाबंदी शिथील करण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.
दोन्ही ठाकरेंची कोंडी? माहिम, वरळी मतदारसंघात परिस्थिती काय?
नेमकं प्रकरण काय?
नगरमधील राजकीय कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची दिनांक 7 एप्रिल 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणांमध्ये संदीप कोतकर यांचाही समावेश होता. संदीप कोतकर यांनी या दुहेरी खून खटल्यात जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्यांना नगर जिल्ह्यामध्ये बंदी करण्यासंबंधी अट घातली होती. सदर अटीतून सवलत मिळण्यासंबंधी कोतकर यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता. आज तो अर्ज निकालासाठी ठेवला होता.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दरुपयोग करून संदीप कोतकर यांनी काल नगर जिल्ह्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून विनापरवानगी जंगी मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक केडगावमधून जात असताना संदीप कोतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या आईला धमकावल्यासंबंधी संग्राम कोतकर यांनी काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंबंधी कोतवाली पोलीस स्टेशन यांनी वेगळी फिर्याद दाखल केली.
सदर दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आज जिल्हा न्यायामध्ये शपथपत्र दाखल करून आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या आईला धमकावले संबंधीची तक्रार दाखल झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्याचप्रमाणे कोतकर यांच्या जिल्हा प्रवेशामुळे नगरमधील विधानसभेची निवडणूक भयमुक्त वातावरणात होऊ शकत नसल्यासंबंधीचे विवेचन न्यायालयासमोर केले होते.
एकंदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच मूळ फिर्यादी यांच्यातर्फे केलेला युक्तिवाद लक्षत घेऊन न्यायालयाने संदीप कोतकर यांचा जिल्हा बंदी उठवण्यासंबंधीचा अर्ज फेटाळला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ञ उमेशचंद्र यादव-पाटील यांनी काम पाहिले.