पाकिस्तानचे तुकडे होणार? बलुचिस्तान नागरिकांचा शहबाज सरकारवर हल्लाबोल

पाकिस्तानचे तुकडे होणार? बलुचिस्तान नागरिकांचा शहबाज सरकारवर हल्लाबोल

Balochistan : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, बलुचिस्तानने (Balochistan ) आपली स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी लावूनच धरलीयं. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलुच लिबरेशन आर्मीकडून मागणी लावून धरण्यात येत आहे. अशात पाकिस्ताकडून बलुचिस्तानवर गंभीर आरोप केले जात असतानाच बलुच लिबरेशनचे नेते नजर बलोज यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल चढवत अत्याचार केल्याचा आरोप केलायं.

व्यापाऱ्यांनो, धमकीला भीक घालू नका, आम्ही संरक्षण देणार; CM फडणवीसांचा दिलासा

पाकिस्तानच्या ताब्यात अससेला बलुचिस्तानचा संघर्ष हा वैध असून ही जागतिक स्तरावरील लढाई असून स्वांतत्र्य चळवळ असल्याचं नजर बलोच यांनी स्पष्ट केलंय. तसेच पाकिस्तानी सैन्य बलुच संघर्षाला बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप करीत आहे. बलुच अतिरेकी निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या दाव्याचे नजर बलोच यांनी खंडन केले आहे.

संविधानिक पदावरून अशी भाषा? सोफिया कुरेशींविषयी संतापजनक विधान करणाऱ्या शाहांना CJI गवईंनी फटकारलं

पाकिस्तान अफगाणिस्तानात आयएससारख्या गटांना पाठिंबा देऊन, परदेशात बलुच असंतुष्टांची हत्या करून आणि शेजाऱ्यांशी शत्रुत्वाचे संबंध राखून अस्थिरता वाढवतो. त्यांनी परदेशात करीमा बलोच आणि साजिद हुसेन यांच्या हत्येसाठी आयएसआयकडे लक्ष वेधल आहे. नझर यांनी संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन, भारत, इराण, अफगाणिस्तान आणि इतर देशांना आयएसआयला दहशतवादी संघटना घोषित करण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानी एअर सिस्टम 23 मिनिटे टप्प, भारतीय हवाई दलाने असा केला हवाई हल्ला

अपहरण झालेल्या फहाद लेहरीचा मृतदेह सापडला आहे. मास्तुंग येथून बेपत्ता झालेला विद्यार्थी फहाद लेहरी याचा मृतदेह दहा दिवसांनी सापडल्यानंतर बलुचिस्तानमधील लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बलुच समितीच्या मते, फहादची हत्या ही एक वेगळी घटना नाही तर बलुचांचा आवाज दाबण्याची मोहिम आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube