व्यापाऱ्यांनो, धमकीला भीक घालू नका, आम्ही संरक्षण देणार; CM फडणवीसांचा दिलासा

Cm Devendra Fadanvis : भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्कीस्तानवर पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर पुण्यातील व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्याची घटना घडली. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिलायं. पाकिस्तान्यांच्या कुठल्याही धमकीला भीक घालू नका, आपण त्यांना घरात घुसून मारलंय व्यापाऱ्यांना आम्ही संरक्षण देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलायं.
'राष्ट्र प्रथम' ही भूमिका स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांचे मनापासून अभिनंदन…
'राष्ट्र प्रथम' यह भूमिका स्वीकारने वाले व्यापारियों का मनःपूर्वक अभिनंदन…(पुणे | 15-5-2025)#Maharashtra #Pune #NationFirst pic.twitter.com/Umsnz5BvFU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 15, 2025
पुढे बोलताना ते म्हणाले, नेशन फर्स्ट भूमिका स्विकारणाऱ्या व्यापाऱ्यांचं अभिनंदनच. पहलगाम हल्ला हा भारतीयांवर नाही तर मानवतेवर झाला होता. मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. व्यापाऱ्यांनो, काळजी करु नका पाकिस्तानला घरात घुसून उद्धवस्त करणारा भारत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
#PahalgamAttack : हॅशटॅग युद्धाचा काही ठोस परिणाम होतो का? सरकार ऐकतं का? घ्या जाणून…
तसेच आता तर न्यूयॉर्क टाईम्सने सॅटेलाईट इमेजसहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलंय, पाकिस्तान भारताला नखंही लावू शकलं नाही. भारताने त्यांना उध्वस्त केलं आहे. त्यांच्या धमकीला भीक घालणयाची गरज नाही, आम्ही सगळ्यांनाच संरक्षण देऊ, असं फडणवीसांनी सांगितलंय.
नोकरी, प्रेम, पैसा… कोणाच्या नशिबात काय? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य
‘भारत तुर्की अन् पाकिस्तानचं काहीही वाईट करु शकत नाही’
पुण्यातील फळ व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कीहून येणाऱ्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. इथून पुढे तुर्कीमधून कोणतेही फळ आम्ही आयात करणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता सुयोग झेंडे यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागले. झेंडे यांना एका अनोळखी नंबरवरून धमकीचा कॉल आला. याबाबत बोलताना झेंडे यांनी सांगितलं की, तुर्कीचे दोनशे ते अडीचशे फळांचे बॉक्स मी विकायचो. मात्र, तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्यानंतर आम्ही तुर्कीचे संफरचंद घेणार नाहीत अशी भूमिका घेतली. त्यानंतर 9 वाजून 13 मिनिटांनी मला धमकीचा फोन आला. मी कामात असल्याने कॉल उचलला नाही. त्यामुळं समोरून व्हाईस रेकॉर्डिंग पाठवण्यात आलं. त्यात तुम्ही पाकिस्तान आणि तुर्कीचं भारत काहीही करू शकत नाही, भारत काहीही वाईट करू शकत नाही, असं फोनवरून सांगितलं आणि त्यांनी फोन कट केला, असल्याचं व्यापारी सुयोग झेंडे यांनी सांगितलंय.