पाकिस्तानी एअर सिस्टम 23 मिनिटे टप्प, भारतीय हवाई दलाने असा केला हवाई हल्ला

पाकिस्तानी एअर सिस्टम 23 मिनिटे टप्प, भारतीय हवाई दलाने असा केला हवाई हल्ला

Pakistani Air Defense System : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले होते मात्र या हल्ल्यापूर्वी भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) तब्बल 23 मिनिटे पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टम जाम केली होती अशी माहिती पीआयबीने दिली आहे. बुधवारी एक प्रेस रिलीज करुन पीआयबीने याबाबत माहिती दिली आहे.

पीआयबीने (PIB) दिलेल्या माहितीनुसार, भारतीय  सैन्याने चिनी बनावटीच्या पाकिस्तानी एअर डिफेन्स जाम करत बायपास केले आणि ऑपरेशन सिंदूर 23 मिनिटांत पूर्ण केले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय एअर डिफेन्सने पाकिस्तानमध्ये असलेल्या परदेशी तंत्रज्ञानाचा धुव्वा उडवला होता, ज्यामध्ये चिनी बनावटीच्या पीएल-15 क्षेपणास्त्राचा आणि तुर्की बनावटीचे यूएव्ही आणि लांब पल्ल्याचे रॉकेट, क्वाडकॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा समावेश होता. अशी देखील माहिती या प्रेस रिलीजमध्ये पीआयबीने दिली आहे.

तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील तब्बल 15 शहरांवर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते मात्र भारतीय लष्कराने भारतीय एअर डिफेन्सच्या मदतीने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.  पहगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

मोठी बातमी! कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन

या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तान असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली होती. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर करावाई सुरु करत सिंधू जल करार रद्द केला होता आणि देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर 6 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube