वाकड गावठाणातून विजयाचा संकल्प : श्रुती वाकडकर यांच्या नेतृत्वाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Shruti Wakadkar : वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ वाकड गावठाणातील ग्रामदैवत

Shruti Wakadkar

Shruti Wakadkar : वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ वाकड गावठाणातील ग्रामदैवत श्री म्हातोबा महाराज मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. श्रद्धा, संस्कार आणि विकासाचा संकल्प एकत्र आणत काढण्यात आलेल्या या भव्य पदयात्रेने संपूर्ण परिसरात उत्साहाचे व परिवर्तनाचे वातावरण निर्माण केले. या पदयात्रेत भाजपा पॅनलच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर, राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पदयात्रेदरम्यान श्रुती राम वाकडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “विकासासाठी विश्वास, विश्वासासाठी सेवा” हा संदेश घेऊन निघालेल्या पदयात्रेला नागरिकांकडून ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फुलांची उधळण, घोषणा आणि ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.

वाकड गावठाण परिसरातील म्हातोबा मंदिर, दत्त मंदिर रोड, उत्कर्ष चौक, माऊली चौक, वाकड पोलीस स्टेशन, काळा खडक रोड मार्गे कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानापर्यंत प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेतन भुजबळ, राम वाकडकर, विशाल आप्पा कलाटे, भारती ताई विनोदे, राजाभाऊ भुजबळ, वसंत कलाटे, गुलाब कलाटे, भरत आल्हाट, बाळासाहेब विनोदे, मोहनदादा भूमकर, हुषारशेठ भुजबळ, प्रकाश जमदाडे, शांताराम विनोदे, संपत विनोदे, राजू करपे, गबल वाकडकर, कांतिलाल भूमकर, संतोष पवार, लक्ष्मण मोहिते, अरुण वाकडकर, नरहरी वाकडकर, किसन वाकडकर, अनिल भुजबळ, विठ्ठल भुजबळ, अशोक भुजबळ, प्रवीण गायकवाड, नवनाथ ताजणे, भानुदास कुदळे उपस्थित होते.

श्रुती राम वाकडकर विकासाचा चेहरा, विश्वासाचं नेतृत्व सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, सामाजिक कार्याची ठाम पायाभरणी असलेल्या श्रुती वाकडकर यांनी वाकड, ताथवडे व पुनावळे परिसरातील नागरी प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला-सुरक्षा, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा या मुद्द्यांवर त्यांची स्पष्ट भूमिका व सातत्यपूर्ण कामगिरी हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच “काम करणारी, ऐकणारी आणि सोडवणारी उमेदवार” अशी ओळख त्यांना नागरिकांनी दिली आहे.

मोठी बातमी! मुंबईत खळबळ; कारमध्ये सापडली तब्बल 16 लाखांची रोकड 

“वाकड, ताथवडे, पुनावळे गावांची संस्कृती जपत आधुनिक विकास, आणि प्रत्येक घरापर्यंत सुविधा हा माझा संकल्प आहे,” परंपरा आणि प्रगतीचा संगम ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होत सुरू झालेली ही पदयात्रा केवळ प्रचार नव्हता, तर परंपरा, संस्कार आणि प्रगती यांचा संगम अन विकासाची नांदी ठरणार आहे. मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 26 चा सुनियोजित विकास साधण्यासाठी कटीबद्ध आहे.
– श्रुती राम वाकडकर, भाजपा उमेदवार प्रभाग क्रमांक 25

follow us