‘सांगली’च्या ‘खेळी’चे खलनायक जयंत पाटील’; माजी आमदार जगतापांचा गंभीर आरोप

‘सांगली’च्या ‘खेळी’चे खलनायक जयंत पाटील’; माजी आमदार जगतापांचा गंभीर आरोप

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली मतदारसंघाचा तिढा राज्यभरात (Sangli Lok Sabha Election) गाजला. या मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी (Vishal Patil) आपला अर्ज कायम ठेवला. सांगलीची जागा काँग्रेसची असताना ठाकरे गटाने हिसकावून घेतली. त्यामुळे विशाल पाटलांचा पत्ता कट झाला, असे वरवर दिसत असले तरी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. त्या कधीच जनतेसमोर आल्या नाहीत. विशाल पाटलांना तिकीट मिळालं नाही. त्यांना तिकीट मिळू न देण्यात कुणाचा काय स्वार्थ आहे याची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. परंतु, राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.

सांगलीच्या वादाचे खरे खलनायक जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप जत तालुक्याचे माजी आमदार विलास जगताप यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. जतमध्ये विशाल पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर (Jayant Patil) गंभीर आरोप केले.

Sangli News : खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल, मैदान सोडून पळू नकोस; विशाल पाटलांना थेट आव्हान

सगळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी खेळी जयंत पाटील यांनीच केली. सांगलीची जागा काँग्रेसला जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटीलच आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी या खेळी केल्या. सांगली जिल्ह्यातून वसंतदादा पाटील घराणं संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं घातलाय, अशी घणाघाती टीका विलासराव जगताप यांनी केली.

विशाल पाटालांना मिळालं लिफाफा चिन्ह

सांगलीत काँग्रेस नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतरही विशाल पाटलांनी मैदान सोडलं नाही. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यानंतर आता विशाल पाटलांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता ते विजयासाठी मतदारांसमोर लिफाफा घेऊन मत मागणार आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना काल (दि. 25) नांदेड येथे विशाल पाटलांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ठाकरेंनी भर पत्रकार परिदेत तो तर बंडखोर असे म्हटले. विशाल पाटलांच्या या भूमिकेवर काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असे म्हणत ठाकरेंनी हा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलवला.

Sangli News : सांगलीच्या पैलवानाला ‘मातोश्रीचा’ आशीर्वाद मिळवून देणारा वस्ताद ‘राष्ट्रवादीचा?’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube