राज्य सरकारची ‘ती’ मागणी योग्यच! शरद पवारांनी दिला सरकारला पाठिंबा

राज्य सरकारची ‘ती’ मागणी योग्यच! शरद पवारांनी दिला सरकारला पाठिंबा

Sharad Pawar On Drought : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात दुष्काळी (Drought) स्थिती निर्माण झाली आहे मात्र राज्य सरकार (State Government) त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. आज शरद पवार मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ स्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे मात्र राज्य सरकार त्यावर म्हणावे तसे लक्ष देत नाही. यासाठी आम्हाला आवाज उचलावा लागत आहे. आम्ही माध्यमांच्या मार्फत या सरकारला जागे करण्याचा प्रत्यन करत आहोत मात्र सरकार वेळेत जागे झाले नाही तर आमच्याकडे इतर मार्ग देखील आहे असा इशारा त्यांनी राज्य सरकारला या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला.

जून महिन्यात कोकणाचा भाग सोडला तर राज्यातील इतर भागात म्हणावा तसा पाऊस पडणार नाही त्यामुळे तातडीने दुष्काळासंबंधीची उपाययोजना केली पाहिजे असं देखील शरद पवार म्हणाले. तसेच राज्यातील दुष्काळ परिस्थिती हाताळायची असेल तर आचारसंहिता शिथील करावीच लागेल, राज्य सरकारची ही मागणी योग्यच आहे, असेही शरद पवार म्हणाले.

याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून सुरू राज्यात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावर देखील शरद पवारांनी भाष्य केला आहे.

शरद पवार म्हणाले, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात 700 ते हजार हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे तर नुकसान हे नुकसान असते त्याला मर्यादा नाही. विशेषतः फळबागांना झालेले नुकसान हे अधिक मोठे असते, त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा असा आवाहन देखील त्यांनी राज्य सरकारला केला.

संभाजीनगरमध्ये 1038 पाण्याचे टँकर चालत आहेत

दुष्काळामुळे संभाजीनगरसह राज्यातील बहुतेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाजीनगरमध्ये 1561 गावात दुष्काळ आहे. तिथे 1038 पाण्याचे टँकर चालत आहेत.पुणे विभागात देखील 635 गावात टँकरने पाणीपुरवठा केलं जात आहे. सध्या 10,572 गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. असं देखील शरद पवार म्हणाले.

विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात आणखी दोन कलम वाढविले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज