दुष्काळाची दाहकता! नगर जिल्ह्यातील गावगाड्याची तहान भागवायला 333 टँकर

दुष्काळाची दाहकता! नगर जिल्ह्यातील गावगाड्याची तहान भागवायला 333 टँकर

Ahmednagar : गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने यंदा दुष्काळाची दाहकता (Drought inflammation)लवकरच जाणवू लागली. यातच नगर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या तीनेश पार झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला 318 गावे आणि 1698 वाडय़ा-वस्त्यांवरील 6 लाख 24 हजार 624 लोकांची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 333 टँकर्सद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अजूनही बरीच गावे, वाडय़ा-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water supply through tankers)करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. यातच कडाक्याचा उन्हाळा (Summer)यामुळे यंदा धरणातील पाण्याची पातळी देखील लवकरच खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा जरी सुरु असला तरी परिस्थिती पाहाता जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Accident प्रकरणी उबाठा आक्रमक; पोलीस आयुक्तांच्या तातडीने बदलीची मागणी

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नगर जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या. यातच जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे. तसतशा टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. त्यामुळे रोज टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यातच नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा देखील खालवू लागला आहे. शिवाय टँकर भरण्यासाठीच्या स्रोतांची पाणीपातळी घटली जाणार असून, पाण्याचे स्रोत मिळविण्याचे नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, प्रत्येक गोष्टीवर…

पाथर्डीत सर्वाधिक टँकर
अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे. यामुळे पाथर्डी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्यां गंभीर बनू लागली आहे. तर केवळ जिल्ह्यातील राहुरी व श्रीरामपूर तालुक्यामध्ये टँकर अद्याप सुरु झालेले नाही.

जिल्ह्यातील एकूण टँकरची संख्या पाहिली असता, यामध्ये संगमनेर 27, अकोले 6, नेवासा 5, नगर 33, पारनेर 35, पाथर्डी 101, शेवगाव 12, कर्जत 45, जामखेड 26, श्रीगोंदा 11, राहुरी व श्रीरामपूरमध्ये अद्याप टँकर सुरु नाहीत, तर पाथर्डी नगरपालिका 6, कर्जत नगरपालिका 11, पारनेर नगरपालिका 3, श्रीगोंदा नगरपालिका 4, शेवगाव नगरपालिका 3 असे एकूण 333 टँकर सध्या नगर जिल्ह्यातील गाव,वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज