Pune Accident प्रकरणी उबाठा आक्रमक; पोलीस आयुक्तांच्या तातडीने बदलीची मागणी

Pune Accident प्रकरणी उबाठा आक्रमक; पोलीस आयुक्तांच्या तातडीने बदलीची मागणी

Shivsena UBT Demand transfer of police commissioner in Pune Accident : शहरातील कल्याणीनगर ( Pune Accident ) भागात चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भरधाव वेगातील पोर्शे (Porsche Car) कारनं दोन आयटी तरूणांचा जीव घेतला. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता पुण्यातील अपघात प्रकरण यामुळे पुणे पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी. याकरीता तातडीने पुणे शहर पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी पुणे शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ( Shivsena UBT ) वतीने करण्यात आली आहे.

Pune Porsche Accident : “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”; फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

पुणे शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख संजय मोरे यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर हिट अँड रनचा गुन्हा घडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्त चाचणीला काही काळ उशिर झाला आहे. याशिवाय एकूण राज्यपातळीवरील अनेक नेत्यांनी यानिमित्ताने पुण्यातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीसांवर दबाब टाकण्याचे काम केले आहे.

Government Schemes : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकूल) योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

केंद्रातील एका मोठा नेता तर यानिमित्ताने गरीब आणि श्रीमंत अशी दरी तयार करीत आहे. त्यात श्रीमंतांनी गरीबांना गाडीने उडविले तरी त्यांना गुन्ह्यातून सवलत अशी पध्दत विकसित करण्याचे काम केले आहे. पुण्यातील या घटनेची नोंद केंद्र पातळीवर घेण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहराची असलेली सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणात माहेरघर अशी चांगली ओळख पुसवून याठिकाणी चुकीची संस्कृती विकसित करण्याचे काम होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.

मोठी बातमी! विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान

राजा बहादुर मिल परिसरात जे पब चालतात त्याठिकाणी पबचालकांनी आंदोलन केले. ड्रिंक, हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने यांच्या परवान्याबाबत कारवाई केली आहे. म्हणून पबवाल्यांनी आज युवकांना सोबत घेउन आंदोलन केले आहे. पुन्हा पुन्हा यांच्या व्यवसायासाठी लहान मोठ्या मुलांचा वापर केला जात आहे. अनधिकृत व्यवसायासाठी याप्रकारे आंदोलन करण्यासाठी पोलीसांकडून परवानगी का दिली गेली ? सदर आंदोलनामधे मुलांचा वापर केल्याबाबत या पब चालकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.

मद्य व अमली पदार्थांसाठी अल्पवयीन मुलांना पबचालकांकडून अगोदरच प्रोत्साहित करून गिऱ्हाईक बनवले गेले आहे. त्यामुळेच मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आणि आता पुन्हा पब चालकांवर व मालकांनी प्रशासन व सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी मुलांचा वापर केला. याबाबत पब मालकांना कडक शासन झालेच पाहिजे. अन्यथा या पबवाल्यांना पोलीसांची साथ असल्याबाबत शिक्कामोर्तब होईल. आणि म्हणूनच पोलीस आयुक्तांची बदली क्रमप्राप्त ठरते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज