मान्सून देवभूमीत दाखल अन् महाराष्ट्रात घामाच्या धारा
Monsoon Arrived : आठ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण देवभूमीत मान्सून दाखल झाला आहे. पण त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भ (Vidarbha)आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra)तापमान 43 अंशाच्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? याची सर्वांना आतुरता लागली आहे. (monsoon-arrived-in-kerala-harsh-summer-in-maharashtra)
राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नाव जाहीर!
महाराष्ट्रामध्ये कमाल तापमानातच नाही तर किमान तापमानामध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उकाडा वाढत आहे. घामांच्या धारा वाहायला लागल्या आहेत. मुंबईसह पालघर जिल्ह्याच्या विविध भागात आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
Odisha Train Accident : प्रवाशांना लागला डोळा अन् तेवढ्यात.. रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ
राज्यभरात उकाडा वाढला असतानाच मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल. मात्र उन्हाचा तडाखा कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत.
विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा शक्यता वर्तवली होती, त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारीच पुढील 24 ते 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली होती. बिपरजॉय चक्रीवादळासह पुढील 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आज केरळात मान्सून दाखल झाला आहे.