Monsoon : आला रे पाऊस आला! प्रतिक्षेनंतर अखेर केरळात मान्सून दाखल…
Monsoon : देशभरात उकाड्याने लाहीलाही होत असतानाच एक सुखद बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. एका आठवड्यानंतर अखेर आज केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे.
Monsoon reaches Indian mainland, IMD declares onset over Kerala
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023
काही दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे 16 जूननंतर मान्सूनचं आगमन होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता हवामानात मोठा बदल झाला आहे.
नथुराम गोडसेच्या देशभक्तीवर शंका घेणार नाही… : भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं विधान
दरम्यान, आज अखेर केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातही लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. केरळमध्ये पहिला पाऊस अनेक भागांत झाला आहे. त्यामुळे केरळमधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सतेज पाटलांचा आठ दिवसांपूर्वीच इशारा अन् कोल्हापूरात दंगल
दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कालच पुढील 24 ते 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. तसेच बिपरजॉय चक्रीवादळासह पुढील 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आज केरळात मान्सून दाखल झाला आहे.