विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात आणखी दोन कलम वाढविले

विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात आणखी दोन कलम वाढविले

Kalyaninagar Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील ( Kalyaninagar) पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 19 मे च्या पहाटे विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर परिसरात मद्य पिऊन भरधाव वेगाने पोर्शे कार चालवून दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात पोलिसांनी विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे.

तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या प्रकरणात माहिती मिळाली आहे की, विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला हॉटेलमध्ये जाऊन मद्य पिण्याची परवानगी दिली होती. याच बरोबर जेव्हा अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता आणि त्यांचा फॅमिली ड्रायव्हर बाजूला बसला होता. मात्र जेव्हा अपघात झाला तेव्हा गाडी अल्पवयीन मुलगा नाहीतर मी गाडी चालवत होते असं पोलिसांना खोटं सांग असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितले आहे.

यामुळे आता पोलीस विशाल अग्रवाल यांच्या विरोधात कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच बरोबर विशाल अग्रवाल यांनी Cctv मध्ये फेरफार केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे पोलिसांनी अग्रवालच्या घरातील कॅमेरे ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, प्रत्येक गोष्टीवर…

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज