MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण: पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा; CCTV मध्ये एकटाच दिसला मित्र

  • Written By: Published:
MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण: पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा; CCTV मध्ये एकटाच दिसला मित्र

Darshana Pawar Murder Case : एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार (Darshana Pawar) हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दर्शनासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरे हादेखील बेपत्ता असून, दर्शनाची हत्या तिच्यासोबत गेलेल्या राहुलनेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या हाती आलेल्या CCTV फुटेजवरू हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

CCTV मध्ये धक्कादायर माहिती समोर
दरम्यान, दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडालेली असताना आता राजगडावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये दर्शना आणि राहुल दोघेही 12 जून रोजी दुचाकीवरून राजगडावर गेले होते. येथे गेल्यानंतर दोघांनी गड चढण्यास सुरूवात केली. मात्र, 10 वाजण्याच्या सुमारास गडावरून राहुल एकटाच परततांना दिसून येत आहे. ही सर्व माहिती गडाशेजारी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आली असून, राहुल घटनेपासून बेपत्ता आहे. त्यामुळे दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाईलचचे लोकेशन परराज्यात
दुसरीकडे, राहुल गडावरून एकटाच खाली येत असल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून राहुलचा कसुन शोध घेतला जात आहे. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. एवढेच नव्हे तर, अनोखळी व्यक्तीच्या मोबाईलवरून त्याने कुटुंबियांना घडलेल्या घटनेत आपण काहीही केले नसल्याचे सांगितले आहे. जर राहुलने काहीच केलेले नाही असे जर तो सांगत असेल तर, तो अद्यापपर्यंत पोलिसांसमोर का आला नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित होत असून, राहुल समोर येईपर्यंत दर्शनाच्या मृत्युचे कारण गुलदस्त्यात राहणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube