Video: नटून-थटून बाहेर पडले अन् गोल गोल फिरले; पिंपरीतील नाट्यसंमेलनावर वंदना गुप्तेंची थेट नाराजी

Video: नटून-थटून बाहेर पडले अन् गोल गोल फिरले; पिंपरीतील नाट्यसंमेलनावर वंदना गुप्तेंची थेट नाराजी

Natya Sammelan : 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे (Natya Sammelan) आयोजन पुण्यातील पिंपरी- चिंचवड भागात करण्यात आले होते. अनेक कलाकारांसह राजकीय व्यक्तींनी या संमेलनात सहभाग नोंदवला होता. (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) या नाट्यसंमेलनातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, काही कलाकारांची गैरसोय झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल वंदना गुप्तेंची थेट नाराजी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


पुण्यातील पिंपरी चिंडवडमध्ये पार पडलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात अनेक ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “मी पुन्हा मुंबईला चालले आहे. मला एकही सभामंडप दिसले नाही, सापडले नाही. नाट्यसंमेलनासाठी मी चांगलं नटून थटून आले होते. परंतु कार्यक्रमस्थळ न मिळाल्याने मी आता पुन्हा परत मुंबईला जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी यावेळी शेअर केला आहे.”

Ranbir Kapoor : सक्सेस पार्टीत अभिनेत्रीला किस केल्यावरून ट्रोल; म्हणाले, ’14 वर्षांनी लहान…’

अभिनेत्री सविता मालपेकर यांची देखील गैरसोय झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी देखील व्हिडीओ शेअर करत “नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ बघायला मिळत आहे. ज्येष्ठ कलाकारांनाही बसायला जागा मिळत नसल्याने अक्षरशः उभे राहावे लागत असल्याचे कलाकारांनी सांगितले आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलावता त्यांची व्यवस्था नीट करा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. मोहन जोशी, सुरेश खरे यांचीही गैरसोय झाल्याचे बघायला मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या नाट्यपरिषद निवडणुकीमध्ये त्या निवडून ही आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत अशी गैरसोय हे फारच दुर्दैवी असल्याचे बोले जात आहे . सविता मालपेकर यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube