Vandana Gupte: राज ठाकरेंनी ‘माझ्या नव्या गाडीचं फाडलं होतं कव्हर’; वंदना गुप्ते यांनी सांगितला मजेशीर किस्सा
Khupte Tithe Gupte: ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या गेल्या अनेक वर्षं आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. नाटक, सिरीयल, हटके सिनेमे अशा अनेक माध्यमांतून चाहत्यांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.
View this post on Instagram
मनोरंजनसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. नुकतंच वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी ‘खुपते तिथं गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांनी करिअरसोबत खासगी आय़ुष्यातील अनेक गोष्टींविषयी मजेशीर किस्सा देखील सांगितला आहे. वंदना गुप्ते यांचे राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे यांच्याशी खूप जुने संबंध असल्याचे यावेळी अभिनेत्रीने सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांना चांगलच ओळखतात. दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरं आहेत. यामुळे अनेकवेळा त्यांचं भेटणं होत असतं. दरम्यान वंदना गुप्ते यांनी राज ठाकरेंशी निगडीत एक मजेशीर किस्सा यावेळी सांगितला आहे. वंदना गुप्ते म्हणाल्या की, गेल्या चार-पाच वर्षांअगोदरची गोष्ट आहे. मी नवीन गाडी घेऊन गल्लीतून येत होते आणि राज ठाकरे नेमकं त्या गल्लीतून फेऱ्या मारत होता. नवीन गाडीला सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतं ते मी काढलं नव्हतं. राज ठाकरे हे पाहताच माझी गाडी थांबवली आणि काच खाली करुन फ्लॅपवरच प्लास्टिक फाडलं.
यामुळे मला बाकीचं कव्हर काढावचं लागलं. मी त्याला म्हणाले मी घरी जाते आणि काढते परंतु तो म्हणाला इथे मराठी माणूस दिसतो. कशाला हवं ते वाचवायचं आहे का तुला कुठं डाग पडेल का म्हणत त्यांनी प्लास्टिक कव्हर फाडल्याचा मजेशीर किस्सा त्यांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान वंदना गुप्ते यांचा बाईपण भारी देवा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने कमाईच्या विषयी अनेक रेकॉर्ड ब्रेक मोडून काढले आहेत.
मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. ४ आठवड्यामध्येच या सिनेमाने ८३.५० कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहेत. स्त्रीयांवर आधारित या सिनेमाचे पुरुष वर्गाकडून कौतुक होत असताना पाहायला मिळत आहे.