OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ

OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ

OMG 2 Gadar 2 Release : अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ आणि सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ आज चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची खासियत म्हणजे हे दोन्ही चित्रपट सिक्वेल आहेत. तसेच ते बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहेत. त्यात आता त्यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्याने कोणता चित्रपट जास्त कमाई करणार? याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यात आता हे चित्रपट प्रेक्षकांनी कसे डोक्यावर घेतलेत? प्रेक्षकांना थिएटरमध्ये काय-काय केले पाहूयात… ( akhay kumar OMG 2 sunny deol Gadar 2 Release audiance dances and pour milk on poster )

मोठी दुर्घटना! पोलिसांची कार नदीत पडली, 7 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी

सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स...

गदर 2 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर आज रिलीज नंतर प्रेक्षकांनी सनी दओल आणि अमिषा पटेलचा गदर 2 डोक्यावर घेतला आहे. काहींनी चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 31.2 कोटींची कमाई करेल असा अंदाज चित्रपट समीक्षक लावत आहेत. तर सोशल मीडियावर गदर 2 चे काहींनी चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्याचे व्हिडीओ आले आहेत. त्यात चाहते ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स करताना दिसत आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! BEL मध्ये विविध पदांची भरती सुरू, वाचा कोणाला करता येणार अर्ज?

अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’ च्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक…

गदर 2 प्रमाणे अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ देखील चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला आहे. तसेच तो ओह माय गॉडचा सिक्वेल आहे. ‘ओह माय गॉड 2’ प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यात आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला आहे. काहींनी प्रशंसा केली आहे. तर काहींनी थेट ‘ओह माय गॉड 2’ च्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक केला आहे. हा चित्रपट सामाजिक संदेशासह धार्मिक देखील किनार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube